Home /News /sport /

IPLमध्ये ‘हे’ 8 कर्णधार ठरले लय भारी! रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर नाही धोनी

IPLचे 12 हंगाम गाजवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोण हा फलंदाज आहे टॉपवर.

  आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल.

  आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना हा हायवोल्टेज होणार आहे. कारण हा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडे मैदानावर होणार आहे. मात्र या हंगामाआधी टॉप 8 कर्णधारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात गेल्या 12 हंगामातील सर्वोत्तम 8 कर्णधारांचा समावेश आहे.

  या रॅंकिंगमध्ये आठव्या क्रमांकावर आहे दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा कर्णधार मुंबईकर श्रेयस अय्यर. गेल्या हंगामात श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने प्ले ऑफपर्यंत मजल मारली. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात तेराव्या हंगामात अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. त्यामुळं तेराव्या हंगामात हा संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

  श्रेयस अय्यरनंतर रविचंद्रन अश्विनचा क्रमांक लागतो. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने केवळ एकाच हंगामात प्ले ऑफपर्यंत मजल मारली आहे. ख्रिस गेल, केएल राहुलसारखे खेळाडू असूनही त्यांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान गेले 5 हंगाम पंजाब संघाने नेतृत्व केल्यानंतर आता अश्विनची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळं पंजाबचे नेतृत्व केएल राहुलकडे असणार आहे.

  अश्विननंतर दिनेश कार्तिकचा सहाव्या क्रमांकावर आहे. 2018मध्ये गौतम गंभीरची हकालपट्टी केल्यानंतर दिनेश कार्तिककडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. त्यानंतर कार्तिकनं लगेचच 2018मध्ये संघाला प्ले ऑफपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर त्यांना प्ले ऑफ गाठता आला नाही. असे असले तरी दिनेश कार्तिककडून या हंगामात जास्त अपेक्षा आहेत.

  पाचव्या क्रमांकावर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाने एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही. मात्र 2009, 2011, 2016मध्ये फायनलपर्यंत मजल मारली. मात्र गेल्या हंगामात विराटचा संघ गुणतालिकेत तळाला होता.

  स्मिथननं दोन वर्षांच्या काळानंतर पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक केला. मात्र त्यानं आपल्या नेतृत्वाखाली पुणे सुपरजायंटस् संघाला पहिल्याच वर्षी फायनलपर्यंत नेले होते. यातही मुंबई इंडियन्सकडून त्यांचा केवळ एका धावेने पराभव झाला. गेल्या वर्षी अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून स्मिथला देण्यात आले. त्यामुळं या हंगामात स्मिथला चांगली कामगिरी करावी लागेल.

  तिसऱ्या क्रमांकावर आहे नवा कॅप्टन कुल केन विल्यम्सन. विल्यम्सननं 2016मध्ये बंगळुरू हरवत पहिल्यांदा सनरायजर्स हैदराबाद संघाला पहिले विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर 2018मध्ये फायनलपर्यंत मजल मारली. मात्र गेल्या हंगामात केननं प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. केनला आयपीएलमधला कॅप्टन कूल असे नाव आहे.

  सर्वात दिग्गज कर्णधार महेंद्र सिंग धोनी या यादीत पहिल्या नाही तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या चेन्नई संघाने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तर, 5 वेळा फायनलपर्यंत मजल मारली आहे. सर्वात जास्तवेळा फायनलपर्यंत पोहचणाऱ्या संघात धोनीचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 2016, 2017मध्ये बॅन लागल्यामुळं चेन्नईचा संघ खेळू शकला नव्हता.

  या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा. गतविजेत्या मुंबई संघाने आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2013मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुंबईने बाजी मारली. रोहितच्या नेतृत्वात तब्बल 8 वेळा प्ले ऑफपर्यंत मुंबईचा संघ पोहचला आहे.

  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Cricket, Rohit sharma

  पुढील बातम्या