Elec-widget

क्रिकेटला मिळणार नवा विराट! 'या' युवा खेळाडूंवर IPLमध्ये लागणार बोली

क्रिकेटला मिळणार नवा विराट! 'या' युवा खेळाडूंवर IPLमध्ये लागणार बोली

हे युवा खेळाडू आयपीएल लिलावात होणार करोडपती!

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : आयपीएल 2020साठी (Indian Premier League 2020) कोलकातामध्ये 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. यासाठी आठही संघ सध्या जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी किंमत मिळू शकते.

याआधी आयपीएल खेळणाऱ्या आठही संघांनी काही खेळाडूंना रिटेन तर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तर, काही खेळाडूंची अदला बदलीही करण्यात आली. त्यानंतरही 971 खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक आहेत. बीसीसीआयनं याबाबत माहिती देताना लिलावात एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत. यात 215 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही सामना खेळलेला नाही तर, 754 खेळाडू हे पहिल्यांदा आयपीएल खेळण्यास उत्सुक आहेत. यामध्ये अनेक भारतीय युवा खेळाडूंचाही समावेश आहे.

वाचा-एका दिवसात होणार 971 खेळाडूंचा लिलाव, लागणार कोट्यावधींची बोली

यशस्वी जयस्वाल

17 वर्षीय यशस्वी जयस्वालनं यंदा विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमी कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमी वयात द्विशतकी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. विजय हजारे स्पर्धेत त्यानं 3 शतक, एक अर्धशतक आणि द्विशतकी खेळी करण्याची कामगिरी 112.80च्या सरासरीनं केली. एवढेच नाही तर त्यांची भारताच्या अंडर-19 संघातही निवड झाली आहे. मुंबईकर यशस्वीला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ त्याच्यावर बोली लावू शकतो.

Loading...

प्रियम गर्ग

उजव्या हाताचा फलंदाज प्रयिम गर्ग गेल्या काही दिवसात विशेष चर्चेत आले आले. कारण अंडर-19 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व प्रियमकडे देण्यात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रियमच्या नावावर द्विशतक आणि लिस्ट एमध्ये शतकी खेळीची नोंद आहे. रणजी करंडक 2018-19मध्ये गर्ग उत्तर प्रदेशकडून खेळताना सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं 67.83च्या सरासरीनं 814 धावा केल्या होत्या. त्यामुळं आयपीएलमध्ये नक्कीच त्याच्या नावाचा विचार केला जाईल.

इशान पोरेल

कोलकाताचा हा गोलंदाज 140 किलोमीट प्रतिताशी वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. 2018च्या अंडर-19 संघातील या खेळाडूनं वर्ल्ड कपमध्ये मॅच विनिंग कामगिरी केली होती. 21 वर्षीय इशान पोरेलनं देवधर ट्रॉफीच्या फायनलमध्ये 43 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. तर, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात 25.60च्या सरासरीनं 10 विकेट घेतल्या होत्या.

वाचा-लिलावाआधीच संकटांचे ढग! दिग्गज खेळाडू म्हणाला ‘IPLमध्ये आता मजा नाही’

विराट सिंह

झारखंडचा फलंदाज विराट सिंह याचे नाव विराट असले तरी तो धोनीचा चाहचा आहे. विराट भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे. तर, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्यानं 3 अर्धशतकही लगावले होते.

एम शाहरुख खान (M Shahrukh Khan):

तमिळनाडूकडून खेळणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये मॅच विनिंग कामगिरी केली. या स्पर्धेत दिनेश कार्तिकनं शाहरुखवर मोठी जबाबदारी सोपवली होती. या स्पर्धेत नाबाद अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला फायनलमध्ये पोहचवले होते. त्यामुळं शाहरुखवर आयपीएलमध्ये नक्कीच चांगली बोली लागू शकते.

वाचा-लँडर विक्रम शोधलात आता एवढ काम करा; IPLमधील संघाची NASAला अजब विनंती!

IPL संघांकडची शिल्लक रक्कम

1. किंग्स इलेव्हन पंजाब, 42.70 कोटी

2. कोलकाता नाइटरायडर्स, 35.65 कोटी

3. राजस्थान रॉयल्स, 28.90 कोटी

4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 27.90 कोटी

5. दिल्ली कॅपिटल्स, 27.85 कोटी

6. सनराजयर्स हैदराबाद, 17.00 कोटी

7. चेन्नई सुपरकिंग्स, 14.60 कोटी

8. मुंबई इंडियन्स, 13.05 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com