IPL 2020 : लिलावाची तारीख ठरली, मात्र टी-20 वर्ल्ड कपमुळं वेळापत्रकात होणार बदल

IPL 2020 : लिलावाची तारीख ठरली, मात्र टी-20 वर्ल्ड कपमुळं वेळापत्रकात होणार बदल

आयपीएलचा तेरावा हंगाम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमुळं लवकर होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगची ओळख आहे. IPL 2020साठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, आतापासून सर्वांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. आयपीएलचा पुढचा हंगाम एप्रिल महिन्यात होणार आहे. यासाठी मोठ्या स्थरावर तयारीला सुरुवातही झाली आहे. याचबरोबर आयपीएलच्या नव्या हंगामासाठी शेकडो खेळाडू लिलावासाठी तयार आहेत.

आयपीएलमध्ये असलेल्या संघाचे मालक सध्या ट्रेंनिग आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना आपल्या संघात सामिल करण्यासाठी प्रयत्न करतील. दरम्यान यातच आता भारतातील सर्वात मोठी लीग आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव याच वर्षी होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. गेल्या वर्षीही डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला होता.

वाचा-IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!

आयपीएलच्या12वा हंगामाला झाली होती लवकर सुरुवात

2019मध्ये आयपीएलचा 12वा हंगाम लवकर आयोजित करण्यात आला होता. याचे कारण म्हणजे इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेला क्रिकेट वर्ल्ड कप. भारतीय संघाला आणि इतर देशातील खेळाडूंना सरावासाठी संधी मिळावी यासाठी आयपीएलचे हंगाम लवकर सुरू करण्यात आले होते. दरम्यान, 2020 ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं आयपीएलचा हा हंगाम महत्त्वाचा असणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयपीएलचा फॉर्म महत्त्वाची भुमिका बजावू शकतो.

टी-20 वर्ल्ड कपसाठी IPL महत्त्वाचा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2020मध्ये लिलाव हा डिसेंबरमध्ये होणार आहे. दरम्यान लिलावाची तारिख अजून ठरलेली नाही. असे म्हटले जात आहे की, यावेळी फ्रेंचायझी 3 कोटी रूपये आपल्या अकाऊंटमध्ये टाकू शकतात, मात्र यासंबंधी अधिकृत माहिती आलेली नाही.

वाचा-भारताचा जेंटलमन आरोपीच्या पिंजऱ्यात! गंभीर आरोपांवर आज होणार फैसला

ब्रॅंड व्हॅल्यूएशननुसार मुंबईचा संघ सर्वात भारी

आयपीएलच्या ब्राँड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार मुकोश अंबानी यांच्या मालकीचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सर्वात वरच्या स्थानावर आहे. या संघाची ब्राँड व्हॅल्यू 809 कोटी इतकी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 8.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी मुंबईचा संघ अव्वल स्थानी राहिला आहे. ब्राँड व्हॅल्यूबाबत चेन्नई सुपरकिंग्ज(Chennai Superkings)ला सर्वात अधिक फायदा झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाच्या ब्राँड व्हॅल्यूत यंदा 13.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चेन्नईची ब्राँड व्हॅल्यू आता 732 कोटी इतकी झाली आहे. या संघावर दोन वर्षाची बंदी घातल्यामुळे त्यांच्या ब्राँड व्हॅल्यूत घसरण झाली होती. अर्थात बंदीनंतरच्या पहिल्या वर्षातच चेन्नईला मोठा फायदा झाला आहे. दिल्ली कॅपिटल संघाच्या शानदार कामगिरीमुळे त्यांच्या ब्राँड व्हॅल्यूत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाचा-Run Outवरून भरमैदानात तू-तू, मैं-मैं! क्रिकेट पीचवरचा मजेदार VIDEO पाहिलात का?

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading