IPL 2020 साठीची शेवटची बोली 85 कोटींची! लिलावात 'या' संघाची असणार हुकुमत

IPL 2020 साठीची शेवटची बोली 85 कोटींची! लिलावात 'या' संघाची असणार हुकुमत

आयपीएल 2020मध्ये खेळाडूंचा लिलाव हा 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगची ओळख आहे. IPL 2020साठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, आतापासून सर्वांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. आयपीएलचा पुढचा हंगाम एप्रिल महिन्यात होणार आहे. यासाठी मोठ्या स्थरावर तयारीला सुरुवातही झाली आहे. याचबरोबर आयपीएलच्या नव्या हंगामासाठी शेकडो खेळाडू लिलावासाठी तयार आहेत. दरम्यान या हंगामात खेळाडूंचा लिलाव हा 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. आतापर्यंत खेळाडूंचा लिलाव हा बंगळुरूमध्ये करण्यात आला होता. पहिल्यांदाच कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

सध्या खेळाडूंची ट्रेंडिग विंडो' सुरू झाली आहे. यात ट्रेंडमध्ये असलेल्या खेळाडूंना लिलावात पहिली संधी मिळणार आहे. 14 नोव्हेंबरला ही यादी बंद होणार आहे. या दरम्यान संघ आपल्याकडे असलेल्या खेळाडूंची अदलाबदली करू शकतात. फ्रेचायझींमना सोमवारी याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक संघाला आयपीएल 2019मध्ये लिलावासाठी 82 कोटींची रक्कम देण्यात आली होती. दरम्यान आता 2020मध्ये हीच रक्कम 85 कोटी करण्यात आली आहे.

यात प्रत्येक संघाला तीन कोटींची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात जास्त म्हणजे आठ कोटी 20 लाख रूपयांची रक्कम बाकी आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघाकडे सात कोटी 15 लाख रूपयांची रक्कम आहे. 2020मध्ये अंतिम लिलाव होणार आहे. त्यानंतर 2021मध्ये नवीन संघ सामिल होऊ शकतात. त्यामुळं खेळाडूंच्या लिलावासाठी हा शेवटचा लिलाव असू शकतो. त्यामुळं हा लिलाव छोटेखानी असू शकतो.

या संघाकडे आहेत इतकी रक्कम

चेन्नई सुपरकिंग्ज- तीन कोटी 20 लाख

दिल्ली कॅपिटल्स- सात कोटी 70 लाख

किंग्ज इलेव्हन पंजाब- तीन कोटी 70 लाख

कोलकाता नाईट रायडर्स- सहा कोची पाच लाख

मुंबई इंडियन्स- तीन कोटी 55 लाख

राजस्थान रॉयल्स- सात कोटी 15 लाख

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- एक कोटी 80 लाख

सनरायजर्स हैदराबाद- पाच कोटी 30 लाख

टी-20 वर्ल्ड कपसाठी IPL महत्त्वाचा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2020मध्ये लिलाव हा डिसेंबरमध्ये होणार आहे. दरम्यान लिलावाची तारिख अजून ठरलेली नाही. असे म्हटले जात आहे की, यावेळी फ्रेंचायझी 3 कोटी रूपये आपल्या अकाऊंटमध्ये टाकू शकतात, मात्र यासंबंधी अधिकृत माहिती आलेली नाही.

आयपीएलच्या12वा हंगामाला झाली होती लवकर सुरुवात

2019मध्ये आयपीएलचा 12वा हंगाम लवकर आयोजित करण्यात आला होता. याचे कारण म्हणजे इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेला क्रिकेट वर्ल्ड कप. भारतीय संघाला आणि इतर देशातील खेळाडूंना सरावासाठी संधी मिळावी यासाठी आयपीएलचे हंगाम लवकर सुरू करण्यात आले होते. दरम्यान, 2020 ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं आयपीएलचा हा हंगाम महत्त्वाचा असणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयपीएलचा फॉर्म महत्त्वाची भुमिका बजावू शकतो.

VIDEO: प्रकाश आंबेडकर आज उमेदवारांची यादी जाहीर करणार? इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 02:37 PM IST

ताज्या बातम्या