IPL 2020 Auction : RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

IPL 2020 Auction : RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

आयपीएल 2020आधीच विराटच्या बंगळुरू संघाला बसला मोठा धक्का.

  • Share this:

बंगळुरू, 06 नोव्हेंबर : बीसीसीआयच्यावतीनं सुरू करण्यात आलेल्या इंडियन प्रिमीअर लीगची (IPL) प्रसिध्दी कोणापासून लपून राहिलेली नाही. आयपीएलचा प्रत्येक हंगाम एक नवीन विक्रम प्रस्थापित करत असतो. आयपीएल 2020साठी काही महिन्यांचा कालावधी उरला असताना डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. या लिलावात सर्व संघ सहभागी होणार आहेत. मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला मोठा धक्का बसणार आहे.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या लिलावात विराट कोहलीचा आरसीबी संघ एकही मोठा खेळाडू खरेदी करू शकणार नाही आहे. याचे कारण आहे पैसा. 19 डिसेंबरला होणाऱ्य लिलावात बंगळुरू संघाकडे दोन कोटी रुपयेही नाही आहेत. त्यामुळं बंगळुरू संघ कोणताही मोठा खेळाडू खरेदी करू शकणार नाही आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरू संघाची नाचक्की झाली होती. अंकतालिकेत हा संघ अगदी शेवटच्या क्रमांकावर होता.

वाचा-आता IPLमधली राडेबाजी होणार बंद, BCCIनं घेतला मोठा निर्णय

बंगळुरू संघाकडे आहे फक्त इतके पैसे

आयपीएल 2020 लिलावात प्रत्येक संघाकडे गेल्या वर्षी उरलेली एक ठराविक रक्कम असते. यात आरसीबीकडे फक्त 1.80 कोटी रुपये आहेत. त्यामुळं कमीत कमी 2 कोटी बेस प्राईज असलेल्या खेळाडूंनाही बंगुळरू संघ विकत घेऊ शकणार नाही आहे. त्यामुळं बंगळुरू संघाला युवा खेळाडूंवर भर द्यावा लागणार आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सकडे 7.7 तर राजस्थानकडे 7.15 अशा या दोन संघाकडे सर्वात जास्त पैसे शिल्लक आहेत.

2018मध्ये ब्रॅंड व्हॅल्यू झाली होती कमी

2019मध्ये IPLच्या ब्रॅंड व्हॅल्यू(Brand Value) मध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार IPLचे ब्रॅंड व्हॅल्यू 4.87 अब्ज इतकी झाली आहे. याआधी या स्पर्धेची ब्रॅंड व्हॅल्यू 4.49 अब्ज इतकी होती.रिपोर्टनुसार विराट कोहली(Virat Kohli) कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू(Royal Challengers Bangalore) संघांची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली आहे. IPLमध्ये या संघांची कामगिरी खराब होती. त्यामुळं या संघांची ब्रॅंड व्हॅल्यू 8 टक्क्यांनी कमी झाली होती.

वाचा-IPLचे संघ जाणार अमेरिका दौऱ्यावर, मुंबई इंडियन्सचा अफलातून प्रस्ताव

आयपीएलच्या लिलावात संघाकडे आहेत इतके पैसे

दिल्ली कॅपिटल्स – 7.7 कोटी

राजस्थान रॉयल्स – 7.15 कोटी रुपये

कोलकाता नाइट राइडर्स – 6.05 कोटी रुपये

सनराइजर्स हैदराबाद – 5.30 कोटी रुपये

किंग्स इलेवन पंजाब – 3.7 कोटी रुपये

मुंबई इंडियन्स – 3.55 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्स – 3.2 कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 1.80 कोटी रुपये

वाचा-गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम!

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

First published: November 6, 2019, 11:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading