IPL 2020 Auction : लिलावाआधीच संकटांचे ढग! दिग्गज खेळाडू म्हणाला ‘IPLमध्ये आता मजा नाही’

IPL 2020 Auction : लिलावाआधीच संकटांचे ढग! दिग्गज खेळाडू म्हणाला ‘IPLमध्ये आता मजा नाही’

IPLच्या तेराव्या हंगामाच्या लिलावासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : आयपीएल ही सध्या क्रिकेटमधली सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेचे आतापर्यंत 12 हंगाम खेळवण्यात आले आहे. तर, 13व्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. मात्र या लिलावाआधी दोन दिग्गज खेळाडूंनी आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळं आयपीएलची उत्साह कमी झाला आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्याआधी खेळाडूंची अदला बदली तसेच काही खेळाडूंनी रिलीजही करण्यात आले. मात्र आता दोन दिग्गज खेळाडूंनी आयपीएलच्या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदज मिशेल स्टार्क आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार यांनी लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. सोमवारी लिलावात सामिल होणाऱ्या 971 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली यात यातून या दोन खेळाडूंचे नाव हटवण्यात आले आहे.

वाचा-IPLचे संघ आता जग जिंकणार! गांगुलीनं तयार केला मास्टरप्लॅन

आयपीएलच्या लिलावातून माघार घेण्याचे या दोन्ही खेळाडूंचे कारण धक्कादायक आहे. मिशेल स्टार्क याने व्यस्त असल्यामुळे खेळू शकणार नसल्याचे सांगितले आहे. तर, जो रूटनं चक्क आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक नसल्याचे कारण दिले. जगातली सर्वात महागडी लीग असूनही यातून खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयपीएल 2020च्या लिलावात 971 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात 258 खेळाडू हे विदेशी असणार आहेत.

वाचा-सौरव गांगुलीने घेतला क्रांतिकारी निर्णय: IPL मध्ये असतील 5 अंपायर!

वाचा-BCCI च्या पॉलिसीमुळे 17 जणांना घ्यावी लागणार निवृत्ती

2015मध्ये स्टार्क खेळला होता आयपीएल

मिशेल स्टार्कनं 2015मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून आयपीएल खेळला होत. तर, 2018मध्ये कोलकाता संघानं 9.4 कोटींना स्टार्कला विकत घेतले होते, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. तर, आयपीएल 2019मध्ये वर्ल्ड कपमुळे मिशेलनं खेळण्यास नकार दिला होता. दरम्यान मिशेल स्टार्क द हंड्रेड लीगमध्ये सामिल होणार असल्यामुळे तो आयपीएल खेळू शकणार नाही आहे. या संघात स्टार्क Welsh Fire संघाकडून खेळणार आहे. या संघात त्याला 1.14 कोटींना विकत घेतले होते. तर, जो रूटला 2018मध्ये लिलावात कोणत्याही संघानं विकत घेतले नव्हते त्यामुळं तो यंदाच्या लिलावात सामिल होणार नाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या