IPL 2020 लिलावाआधीच 639 खेळाडूंचा पत्ता कट! 'हा' खेळाडू ठरणार महागडा

IPL 2020 लिलावाआधीच 639 खेळाडूंचा पत्ता कट! 'हा' खेळाडू ठरणार महागडा

19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. यात 332 खेळाडूंवर बोली लावण्यात येईल.

  • Share this:

कोलकाता, 12 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी आठही संघ सध्या संघ बांधणीकरिता सज्ज झाले आहेत. यासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातील सर्वच खेळाडू इच्छूक आहेत. मात्र लिलावाआधीच 639 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याता आला आहे. त्यामुळं आयपीएलच्या लिलावात 332 खेळाडूंवर बोली लागणार आहे.

लिलावाआधी काही खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. यात 332 खेळाडूंची नावे आठही संघांना पाठवण्यात आली आहेत. लिलावासाठी एकूण 971 खेळाडू उत्सुक होते, मात्र त्यातील 639 नावे हटवण्यात आली आहेत. शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये 19 भारतीय असे आहेत, ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर, 24 खेळाडू हे आयपीएलमध्येच पदार्पण करतील, यात सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे रॉबिन उथप्पा (Robin Uthappa). उथप्पाची बेस प्राईज आहे 1.5 कोटी, त्यामुळं उथप्पावर सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. गेल्या दोन हंगामात जयदेव उनाडकतची बेस प्राईज एक कोटी होती. दरम्यान, आयपीएल 2020मध्ये केवळ 73 खेळाडूंना विकत घेतले जाणार आहे. दरम्यान सकाळी 10 वाजता लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.

वाचा-‘विराट तुने क्या किया?’, ऋषभ पंतमुळे सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल

या लिलावात केसरिक विल्यम्सचादेखील समावेश

या यादीमध्ये केसरिक विल्यम्स, मुश्फिकुर रहीम आणि अ‍ॅडम जंपा यांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत वेस्ट इंडीज मालिकेदरम्यान केसरिक विल्यम्स बरीच चर्चेत आले होते. त्याच्या आणि विराट कोहलीच्या मैदानावर बरेच संघर्ष झाले. ग्लेन मॅक्सवेलबाबत काही संघांमध्ये कठोर संघर्ष होऊ शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. त्याची बेस प्राईड किंमत 2 कोटी रुपये आहे परंतु तुफानी फलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि उपयुक्त फिरकी गोलंदाजीमुळे तो कोणत्याही संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यांच्याशिवाय इयॉन मॉर्गन आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांनाही मोठी बोली लागू शकते.

वाचा-रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

2 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू

या यादीमध्ये 2 कोटी बेस प्राईज असलेले एकूण 7 खेळाडू आहेत. यात डेल स्टेन (दक्षिण आफ्रीका), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), जॉस हेजलवुड (ऑस्ट्रेलिया), क्रिस लिन (ऑस्ट्रेलिया), मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया), ग्रेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) आणि अंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) यांचे नाव आहे.

वाचा-IPLच्या इतिहासातले सर्वात महागडे खेळाडू, कोट्यावधींची बोली लावूनही झाले फेल!

1.5 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू

तर, या लिलावात एकूण 9 खेळाडूंची बेस प्राईज ही 1.5 कोटी आहे. यात भारताचा आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पा याचे नाव आहे. याशिवाय या यादीत शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया), केन रिचर्ड्सन, इयॉन मोर्गन (इंग्लंड), जेसन रॉय (इंग्लंड), क्रिस वोक्स (इंग्लंड), डेविड विली, क्रिस मॉरिस यांसारखे खेळाडू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या