मुंबई, 18 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आयएपीएलची क्रिकेट चाहते आतुरेतेन वाट पाहत असताचा मात्र सुंदर चेहऱ्यातील अँकर्सकडेही सर्वांचे लक्ष असते. दरम्यान यातच प्रसिद्ध अँकर मयंती लँगर (mayanti-langer) आयपीएल 2020 च्या अँकर लिस्टमध्ये नसल्यानं चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र याबाबल मयंतीने ट्वीट करत का भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे.
मयंतीने स्वत: ट्वीट करत आयपीएलमध्ये भाग न घेतल्याचे कारण सांगितले आहे. मयंती आणि स्टुअर्ट बिन्नी 6 आठवड्यांआधी आई-बाबा झाले आहेत. मंयती आणि बिन्नी यांना मुलगा झाल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले. या कारणामुळे मयंती यावेळी आयपीएल होस्ट करताना दिसणार नाही आहे. आपल्या चाहत्यांचेही मयंतीने यावेळी आभार मानले. मयंती गेल्या अनेक वर्षांपासून स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरिंगकरते.
वाचा-IPL 2020 मधून स्टार अँकर मयंती लँगर बाहेर, या सुंदर चेहऱ्यांना मिळाली संधी
So I’m going to love watching the IPL @StarSportsIndia all the best to the team 😁 @jatinsapru @suhailchandhok @cricketaakash @SanjanaGanesan @ProfDeano @scottbstyris @BrettLee_58 @Sanjog_G and the full gang!! pic.twitter.com/fZVk0NUbTi
— Mayanti Langer Binny (@MayantiLanger_B) September 18, 2020
वाचा-IPL 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार 'विराट'!
मंयती लॅंगरने ट्वीट करत, यावेळी आयपीएल 2020चा आनंद संपूर्ण गॅंगसोबत घेणार असल्याचे सांगितले. मयंतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपल्या बाळासोबत आणि स्टुअर्ट बिन्नीसोबत दिसत आहे. याआधी बिन्नीवरून मयंतीला अनेकदा ट्रोलकही करण्यात आले होते. मात्र मयंतीलने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते.
वाचा-'हा' संघ आहे बुकींचा फेव्हरेट! वाचा कोणत्या संघावर आहे कितीचा सट्टा
दुसरीकडे आयपीएल 2020ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये मंयती अँकरिंग करताना दिसणार नसली तरी सुरेन सुंदरम, कीरा नारायणन, नषप्रीत कौर, तान्या पुरोहित या आयपीएलचे अँकरिंग करताना दिसतील.