Home /News /sport /

IPL 2020: 'कर्णधार बदलाल पण टीमचं काय?', या दिग्गज क्रिकेटपटूनं केली विराटची पाठराखण

IPL 2020: 'कर्णधार बदलाल पण टीमचं काय?', या दिग्गज क्रिकेटपटूनं केली विराटची पाठराखण

विराट गेली 8 वर्ष RCBचा कर्णधार असून अजून एकदाही त्यांना आयपीएलचा किताब जिंकता आला नाही आहे.

    नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचे (RCB) पुन्हा एकदा आयपीएल (IPL 2020) जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. विराट गेली 8 वर्ष RCBचा कर्णधार असून अजून एकदाही त्यांना आयपीएलचा किताब जिंकता आला नाही आहे. यावर्षी RCBच्या संघानं प्लेऑफपर्यंत मजल मारली होती, मात्र एलिमिनेटर सामन्यात त्यांना पराभव सनरायजर्स हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला, यानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून त्याच्यावर दिग्गजांनी टीका केली. गौतम गंभीरनं विराटनं कर्णधारपद सोडावं असे सांगितले. मात्र भारताचा दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवागनं (Virender sehwag) विराटची बाजू घेतली आहे. सेहवागनं एकटा कर्णधार काय करेल? असे विचारत RCBला कर्णधार नाही संघात बदल करण्याची गरज आहे असे सांगितले. RCBच्या पराभवानंतर सेहवागनं क्रिकेट वेबसाइट क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत, "बॅंगलोरचा संघ केवळ विराट आणि एबीच्या बॅटिंगवर निर्भर आहे. कर्णधार कितीही चांगला असेल, मात्र संघ चांगला नसेल तर काहीही होऊ शकत नाही. विराट जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार असतो तेव्हा परिणाम वेगळे असतात. मात्र RCBकडून खेळतात तेव्हा चांगली कामगिरी करत नाही, जिंकत नाही. सेहवाग असेही म्हणाला की, बॅगलोरकडे एक चांगली बॅटिंग ऑर्डर नाही आहे. संघात बदल करण्याची गरज आहे. वाचा-IPL 2020 : चूक कुठे झाली? विराटने सांगितलं पराभवाचं कारण गंभीरनं केली कर्णधार बदलण्याची मागणी RCBच्या पराभवानंतर गंभीरनं इएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना, RCBला आपला कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे. गंभीरनं सांगितले की, " 8 वर्ष कप न जिंकणे हा मोठा कालावधी आहे. ही जबाबदारीची बाब आहे. त्यामुळे कोहलीनं जबाबदारी ओळखून कर्णधारपद सोडावं". मुख्य म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी आला मात्र 6 धावा करत बाद झाला. वाचा-IPL 2020 : आयपीएलमधून बँगलोर बाहेर, विराट झाला भावुक आज हैदराबादचा सामना दिल्लीशी बँगलोरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता हैदराबादचा सामना दिल्लीशी होणार आहे. रविवारी या दोन्ही टीममध्ये क्वालिफायरची दुसरी मॅच होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, ती मंगळवारी मुंबईविरुद्ध आयपीएलची फायनल खेळेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या