VIDEO : IPLच्या नव्या जाहिरातीनं उडवली धोनीची खिल्ली, चाहत्यांनी गांगुलीवर काढला राग

VIDEO : IPLच्या नव्या जाहिरातीनं उडवली धोनीची खिल्ली, चाहत्यांनी गांगुलीवर काढला राग

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलच्या या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलच्या या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयपीएलची नवी जाहिरात आज लॉंच करण्यात आली. आयपीएलच्या या जाहिरातीमध्ये धोनीची खिल्ली उडवण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये चाहते संघ आणि खेळाडूंना आपली ताकद म्हणत असल्याचे दिसत आहे. जाहिरातीची सुरुवात धोनीपासून होताना दाखवली आहे. यात धोनीवर इतर संघाचे चाहते मस्करी करताना दिसत आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. त्यामुळ या जाहिरातीत मुंबईचे चाहते धोनीला ट्रोल करताना दिसत आहे. आयपीएलची ही जाहिरात काही चाहत्यांना आवडली नाही आहे. जगातील पहिल्या क्रमांकाच्या टी -20 लीगची जाहिरात करण्यासाठी प्रत्येकाची चेष्टा केली गेली आहे हे लोकांना आवडले नाही आहे.

वाचा-थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना

वाचा-भारताचा स्टार कॉमेंटेटर खेळणार IPL! धोनीला पुन्हा चॅम्पियन करून घेणार निवृत्ती

तर, काही चाहते धोनीला पाहून खुळ आहेत. मुख्य म्हणजे धोनी तब्बल 8 महिन्यांच्या कालावधीनंतर मैदानात उतरणार आहे. धोनीनं वर्ल्ड कप 2019मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनीनं क्रिकेटमधून जवळ जवळ ब्रेक घेतला होता. आता धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे.

वाचा-धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना

जाहिरातीमध्ये, खेळाडूंच्या दुर्बलतेवरही मस्करी करण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकदाही विजेतेपद मिळवण्यात आले नाही त्यापासून ऋषभ पंतच्या फॉर्मवर मस्करी केली आहे. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाला जिंकून दाखवण्याचे चॅलेंज केले आहे.

50 दिवस चालणार आयपीएल

क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार, या हंगामातील सामना 29 मार्च ते 17 मे दरम्यान खेळले जातील. आयपीएलचा 12वा हंगाम 44 दिवस चालला होता, तर तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे. या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्स वगळता इतर सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तर राजस्थान संघाचे सामने गुवाहटी येथे होणार आहेत.

वाचा-धोनीला निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडलं जातंय? गांगुलीने खास सामन्यातून वगळलं

8 महिन्यांनंतर मैदानात उतरणार धोनी

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी 29 मार्च रोजी 8 वाजता वानखेडे मैदानावर सामना होईल.याआधी धोनी कोणता सामना खेळेले याची शक्यता कमी आहे. धोनीनं अखेरचा सामना 10 जुलै 2019मध्ये खेळला होता. आता 8 महिन्यांनंतर 29 मार्च 2020 रोजी धोनी मैदानात उतरेल. दरम्यान धोनीचे टीम इंडियात कमबॅक हे त्याच्या आयपीएलमधील फॉर्मवर अवलंबून असेल. आयपीएलनंतर भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे तयारी करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 01:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading