IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

सुर्यकुमार यादवनं 71 धावांची खेळी केली, मात्र रोहितच्या त्या एका सल्ल्यानं सामन्याला कलाटणी मिळाली.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 09:54 AM IST

IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

चेन्नई, 08 मे : पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहज वियय मिळवत रोहित शर्माच्या मुंबई पलटननं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती, सुर्यकुमार यादवनं 54 चेंडूत 71 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईनं चेन्नईवर सहज विजय मिळवला. यात सुर्यकुमारनं महत्त्वाची भुमिका बजावली असली तरी, रोहितच्या त्या सल्ल्यानं मुंबईनं हे आव्हान गाठलं

प्ले ऑफमधील पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. दीपक चाहरच्या चेंडूवर अपील केल्यानंतर पंचानी रोहित शर्माला बाद दिले. त्यानंतर डीआरएसचा निर्णय रोहित शर्माने घेतला. त्यातही पंचांचा निर्णय़ योग्य असल्याने रोहित शर्मा बाद ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धडाक्यात सुरुवात केली. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

वाचा- VIDEO : असं काय झालं की दुसऱ्याच चेंडूवर मुंबईला घ्यावा लागला डीआरएस?

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात क्विंटन डीकॉक तंबूत परतला. त्याला हरभजनसिंगने 8 धावांवार बाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी 80 धावांची भागिदारी केली. या भागीदारीमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली ती, रोहित शर्मानं. इशान आणि सुर्यकुमार फलंदाजी करत असताना स्ट्राटजिक टाईमध्ये रोहित मैदानात आला होता. दरम्यान मैदानात उतरल्यानंतर रोहितनं सुर्यकुमार आणि इशानला काय सल्ला दिला याकडं धोनीचंही लक्ष्य लागले होते. रोहितनं या दोघांना आक्रमक फलंदाजी न करता एकेरी, दुहेरी धावा काढण्याचा सल्ला दिला असावा, यामुळं त्या दोघांनी मोठे धावा खेळण्याचे टाळले.


Loading...


वाचा- मुंबईच्या 'या' खेळाडूचं मातृप्रेम! भरमैदानात अशी जागवली होती आईची आठवण

दरम्यान आपल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं चेन्नईवर एवढा सहज विजय मिळेल अशी अपेक्षा नव्हती हे मान्य केलं. तर, यावेळी रोहितनं आपला मास्टरप्लॅनही सांगितला. चेपॉकचं मैदान फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्यामुळं आपल्या संघात तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली. तसेच, रोहितनं मान्यही केलं की, " चेन्नईचा संघ हा चांगलाच समतोल असल्यामुळं त्यांच्याविरुद्ध सामना खेळताना विशेष रणनीती आखावी लागली. म्हणुन आम्हीदेखील या सामन्यात चेन्नईविरुद्ध विशेष रणनीती आखली होती. पण आम्ही रणनितीची योग्य अमंलबजावणी केली याचा आनंद आहे’’, असे मत व्यक्त केले.

वाचा- VIDEO : इतर संघांपेक्षा मुंबईची जास्त भीती? पाहा धोनी काय म्हणाला

VIDEO: यंदा राज्यात मध्यम पावसाची शक्यता, भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...