News18 Lokmat

VIDEO : मैदानात धोनीची कमाल, प्रेक्षक गॅलरीत झिवाची धमाल पाहा

झिवाला गाणं म्हणताना, खेळताना, वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलताना बघितलं असेल पण स्टेडियममध्ये धमाल करताना पाहिलं आहे का?

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 08:13 AM IST

VIDEO : मैदानात धोनीची कमाल, प्रेक्षक गॅलरीत झिवाची धमाल पाहा

दिल्ली, 27 मार्च : आयपीएलच्या गतविजेत्या चेन्नईने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. चेन्नईला सहजपणे विजय मिळेल असे वाटत असतानाही सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. महेंद्रसिंग धोनीची लेक झिवा हा सामना बघताना एका वेगळ्याच रुपात दिसली.

आतापर्यंत ती खेळताना, गाणं म्हणताना इतकंच काय ती वेगवेवळ्या भाषांमध्ये बोलताना दिसली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात तर तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. शेवटच्या काही षटकांत धोनी मैदानावर होता तेव्हा झिवा प्रेक्षक गॅलरीतून चिअर अप करताना दिसत होती. झिवाचा हा व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे.



धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेटने नमवले. चेन्नईकडून वॉटसनने 26 चेंडूत 44, रैनाने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. तर धोनी आणि जाधवने अनुक्रमे 32 आणि 27 धावा केल्या.

Loading...



दिल्लीविरुद्धचा सामना चेन्नई सहज जिंकेल असं वाटत होतं. शेवटच्या षटकात चेन्नईला फक्त 2 धावांची गरज होती. दिल्लीचा रबाडा गोलंदाजीला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर केदार जाधवला बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ड्वेन ब्राव्होला पुढच्या सलग 2चेंडूंवर एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर ब्राव्होने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने चेन्नई गुणतक्त्यात पहिल्या स्थानी पोहचली आहे.

दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने चेन्नईला 148 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीकडून शिखर धवनने 45 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर चेन्नईच्या ब्राव्होने टिच्चून गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्या.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...