VIDEO : जेव्हा गोलंदाज, कर्णधार, फलंदाज, पंच चेंडू शोधतात तेव्हा

VIDEO : जेव्हा गोलंदाज, कर्णधार, फलंदाज, पंच चेंडू शोधतात तेव्हा

या प्रसंगामुळं कर्णधार, फलंदाज आणि प्रेक्षक यांच्यात चांगलाच हशा पिकला.

  • Share this:

बंगळुरू, 24 एप्रिल : बंगळुरू आणि पंजाब विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूनं आपला तिसरा सामना जिंकत विजयी हॅट्रिक साधली. या विजयात एबी डिव्हिलियर्सची 82 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. मात्र, या सामन्यात एबीच्या फलंदाजीशिवाय एक प्रसंग चांगलाच चर्चेचा विषय बनला तो म्हणते हरवलेला चेंडू.

पंजाबनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरुवातीला गोलंदाजांनी योग्य ठरवत कर्णधार विराट कोहलीला 13 धावांवर बाद केलं. मात्र, त्यानंतर एबी आणि स्टोईनीसनं बंगळुरूला सावरलं. मात्र अकिंत राजपूतच्या 14व्या ओव्हरला एक अजब प्रसंग घडला. या षटकाच्या सुरुवातीलाच गोलंदाज, फलंदाज आणि पंच सगळेच चेंडू शोधत होते.

14व्या ओव्हरच्या सुरूवातीला अंकितनं पंचांकडे चेंडू मागितला, पण पंचांकडे चेंडू नसल्यानं एकच तारांबळ उडाली. त्यानंतर अखेर चौथ्या पंचांनी चेंडू आणून दिला. पण पंच मात्र, चेंडू गेला कुठं हेच शोधत होते. अखेर पंच शामसुद्दीन यांनी आपल्या खिशात चेंडू ठेवला होता. या प्रसंगामुळं पंचांनी पुन्हा एकदा गोंधळ घालत सामना काहीकाळ थांबवला. मात्र प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

दरम्यान, बंगळुरूनं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना, पुरननं 28 चेंडूत 46 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 42 धावा केल्या. मात्र त्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. गेलही या सामन्यात 23 धावा करत बाद झाला. बंगळुरूकडून उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी दोन विकेट घेतल्या. स्टेनच्या जागी खेळणाऱ्या टीम साऊदीला एकही विकेट घेता आली नाही.

दरम्यान, प्रथम नाणेफेक जिंकत पंजाबनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यातही विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर पार्थिव पटेलनं 43 धावांची चांगली खेळी केली. मागच्या सामन्यातही पार्थिवची बॅट तळपली होती. पार्थिवनं 24 चेंडूत 43 धावा केल्या.

त्यानंतर स्टोईनीस आणि एबी यांनी 64 चेंडूत शतकी भागीदारी करत बंगळुरूचा डाव सांभाळला. एबीनं आपलं 33वं अर्धशतक या सामन्यात पुर्ण केलं. या खेळीच्या जोरावर बंगळुरूनं सामना जिंकला.

मोदींच्या गुजरातमधील गावाचाच लावला VIDEO, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 24, 2019 11:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading