विराटनं दिलेला ‘तो’ सल्ला मी कधीही विसरणार नाही : ऋषभ पंत

भारतानं जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या संघात ऋषभ पंतला डच्चू दिल्यानं नवे वाद निर्माण झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 10:49 PM IST

विराटनं दिलेला ‘तो’ सल्ला मी कधीही विसरणार नाही : ऋषभ पंत

नवी दिल्ली, 01 मे : आयपीएलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कोणता संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करतो, याची उत्सुकता आता रंगु लागली आहे. मात्र, आयपीएलनंतर विश्वचषकाला सुरुवात होणार असल्यामुळं सर्व संघ सध्या जय्यत तयारीला लागले आहेत. यातच भारतानं जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या संघात काही खेळाडूंना डच्चू दिल्यानं नवे वाद निर्माण झाले होते.

भारतानं जारी केलेल्या संघात ऋषभ पंतला संधी न दिल्यानं अनेक माजी क्रिकेटपटूंनी भुवया उंचावल्या होत्या. रिषभ पंतनं स्वत: संघात स्थान न मिळाल्यामुळं दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र, ‘’त्यानं मी आता या गोष्टींच्या पुढे गेलो आहे’’, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, धोनी आणि विराट यांच्याकडून मी खुप शिकलो आणि कायम शिकत राहीन अशी प्रतिक्रिय पंतनं एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

पंतनं विश्वचषकात स्थान न मिळाल्यामुळं, ‘’मी खुप दु:खी होतो. प्रत्येक खेळाडू आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकण्याची आशा ठेवतो. हा एक वेगळाच अनुभव असतो. मलाही तो अनुभव घ्यायचा होता. पण हा काही अंत नाही. मी आणखी जोशात प्रयत्न करेन’’, असा विश्वास व्यक्त केला.

विराटचा ‘तो’ सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा

ऋषभ पंत या नवख्या खेळाडूनं अनुभवी खेळाडू धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकडून खुप शिकलो असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी तो म्हणाला, ‘’विराटनं मला दिलेला एक सल्ला मी कधीही विसरणार नाही. तो बोलला होता की, अनुभवी खेळाडू बनण्यासाठी 100 सामने खेळने गरजेचे आहे. दुसऱ्या खेळाडूंच्या चुकांमधून शिका, ते खुप गरजेचं आहे. हा विराटचा सल्ला मी कधीही विसरणार नाही’’, असं मत व्यक्त केलं.

Loading...


VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 30, 2019 10:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...