RCB च्या पहिल्या विजयाला गालबोट, विराटला दंड

धोनीनंतर विराटलासुद्धा दंड, यंदाच्या आयपीएलमध्ये दंड झालेला चौथा कर्णधार

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 11:12 AM IST

RCB च्या पहिल्या विजयाला गालबोट, विराटला दंड

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने यंदाच्या आयपीएलमध्ये सलग सहा पराभवानंतर सातव्या सामन्यात पहिला विजय मिळवला.

मोहालीत किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध झालेल्या सामन्यात कोहलीच्या 67 आणि डिव्हिलियर्सच्या नाबाद 59 धावांच्या जोरावर आरसीबीने दणक्यात विजय साजरा केला. पण या पहिल्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच कर्णधार विराट कोहलीला दंडही झाला.

शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध संथ गतीने षटके टाकल्याबद्दल कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हा त्यांच्या संघाचा पहिलाच गुन्हा आहे.

Loading...

यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधारांना दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनीला आयपीएलने दंड केला आहे. त्यानंतर आता विराट कोहलीलासुद्धा संथगतीने षटके टाकल्याबद्दल दंड करण्यात आला आहे.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला संथ गतीच्या षटकांचा फटका बसला आहे.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला नियमाविरुद्ध मैदानात प्रवेश करून पंचांशी हुज्जत घातल्याने दंड करण्यात आला. त्याला सामन्याच्या 50 टक्के मानधनाइतक्या दंडाची कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...