IPL 2019 : बंगळुरूचा संघ म्हणजे कागदी वाघ, माल्याची विराटवर टीका

IPL 2019 : बंगळुरूचा संघ म्हणजे कागदी वाघ, माल्याची विराटवर टीका

शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवत बंगळुरू संघानं आपला शेवट गोड केला.

  • Share this:

मुंबई, 07 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरु संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. मात्र तरी, बंगळुरू संघानं आयपीएलमधला आपला शेवट विजयानं केला त्यामुळं घरच्या मैदानावर त्यांना लाज राखता आली. तरी, बंगळुरूचा संघ गुणतालिकेत मात्र तळालाच राहिला. दरम्यान, बंगळुरूच्या या कामगिरीवर संघाचा माजी मालक आणि सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानं नाराजी व्यक्त करत विराटवर टीका केली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूनं आपल्या घरच्या मैदानावर अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट राखून विजय मिळवला. तरी, या संपूर्ण स्पर्धेत बंगळुरूच्या गोलंदाजांना मात्र सफलता मिळाली नाही. बंगळुरूनं आपली आयपीएलमधली सुरुवातच पराभवानं केली. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून मिळालेल्या धक्क्यानंतर बंगळुरूच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली.

वाचा- IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात

मात्र, गोलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. फलंदाजीतही विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान शेवटच्या सामन्यात विजय मिळवत आपल्या घरच्या मैदानावर शेवट गोड केला. यावेळी विराटनं त्यांनी सर्वांचे आभारही मानले. दरम्यान, विराटच्या या पोस्टवर संघाचा माजी मालक विजय मल्ल्याने सोशल मीडियावरून नाराजी प्रकट केली. त्याने लिहिले की,''हा संघ जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ आहे, परंतु हे सर्व कागदावरच वाघ आहे. ''

वाचा- IPL 2019 : कोण आहे 'ही' RCBची हॉट मिस्ट्री गर्ल ?

दरम्यान माल्या हा विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आल्यापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळं त्याच्याकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले त्याचवेळी आरसीबी संघानं माल्याकडून सर्व अधिकार काढून घेतले. तरी तो नेहमीच बंगळुरू संघाच्या कामगिरीवर टीका करत असतो.

वाचा- IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात

VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

First published: May 7, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या