VIDEO : शाहरुखचा हिरो मलिंगासमोर ठरला झिरो

VIDEO : शाहरुखचा हिरो मलिंगासमोर ठरला झिरो

मलिंगाच्या या ओव्हरममुळं रसेल चक्क शुन्यावर बाद झाला.

  • Share this:

मुंबई, 05 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना आज झाला. दरम्यान या सामन्यात मुंबईनं आपल्या होमग्राऊंडवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आली आहे. तर दुसरीकडं कोलकाताचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकातानं दिलेलं 134 धावांचं आव्हान 16.1 मुंबईनं ओव्हरमध्ये पार केलं. यात रोहितची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्याला सुर्यकुमार यादवनंही चांगली साथ दिली.

दरम्यान मुंबईच्या विजयामुळं हैदराबादच्या संघानं 12 धावांसह प्ले ऑफमध्ये एण्ट्री घेतली आहे. रोहितला सुर्यकुमार यादवनंही चांगली साथ दिली. मुंबईनं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मलिंगानं कोलकाचा सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगान कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तुफानी फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही.

कोलकाता नाइट रायडर्ससाठी हा सामना निर्णायक होता. त्यामुळे या सामन्यात आंद्रे रसेल मोठी खेळी करेल, असे अपेक्षा असताना, या सामन्यात रसेलला भोपळाही फोडता आला नाही. मुंबई इंडियन्सच्यालसिथ मलिंगाने रसेलला शून्यावर बाद केले. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, की आयपीएलमध्ये तुफान आणणारा हा फलंदाज आज महत्त्वाच्या सामन्यात चक्क शुन्यावर बाद झाला. कोलकात्याच्या तेराव्या षटकामध्ये रसेल फलंदाजीला आला, पण पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने वेगाने एक चेंडू रसेलच्या बॅटजवळून टाकला. हा चेंडू रसेलच्या बॅटला लागून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यष्टीरक्षक क्विंटर डीकॉकने कोणतीही चूक न करता हा झेल टिपला. त्यामुळे रसेलला पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतावे लागले.

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'

First published: May 6, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading