News18 Lokmat

VIDEO : 40 चेंडूत 80 धावा करणाऱ्या 'या' फलंदाजानं चक्क बुटांना केलं किस

आईपीएलच्या बाराव्या हंगामात 50हून अधिक षटकार मारले आहेत. आज याच तुफानी फलंदाजाचा 31वा वाढदिवस आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 06:06 PM IST

VIDEO : 40 चेंडूत 80 धावा करणाऱ्या 'या' फलंदाजानं चक्क बुटांना केलं किस

कोलकाता, 29 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या तुफानी फलंदाजीमुळं गोलंदाज आणि सर्व संघाच्या मनात भिती घालणारा कॅरेबियन खेळाडू आंद्रे रसेल आज 30 वर्षांचा झाला.

29 एप्रिल 1988ला जमैकामध्ये जन्म झालेल्या हा खेळाडू सध्या आयपीएलमध्ये पॉवरहिटर आहे. रसेलच्या ताकदीचा अंदाज आपल्याला त्याच्या मैदानावरील आकड्यांकडे बघुनच कळते. आयपीएलच्या या हंगामात त्यानं 50हून अधिक षटकार मारले आहेत. मात्र, मैदानात जेवढा आक्रमक रसेल असतो, तेवढाच रोमॅंटिक आणि शांत तो मैदानाबाहेर आहे.

रसेलच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रसेलची पत्नी जैसिम हिनं रसेलला एक गिफ्ट दिलं. जैसिमनं रसेलला शुज गिफ्ट केले. रसेलला हे बुट एवढे आवडले की त्यानं चक्क त्या बुटनं किस केलं.


आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त जैसिम लौरानं इन्स्टाग्रामवर खास पोस्ट टाकत त्याला विश केलं. जैसिमनं तीचे आणि रसेलचे काही फोटो टाकले.

Loading...


दरम्यान कोलकाता विरुद्ध मुंबईच्या लढतीत रसेलने 40 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार आणि 8 षटकार लगावले. या जोरावर कोलकाताने 20 षटकांत 2 बाद 232 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईला 198 धावांपर्यंतच मजल मारता आली.

मुंबईवर विजयानंतर रसेलच्या पत्नीने त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी तिने रसेलला प्रश्न विचारला की, खेळताना कोणता दबाव होता का? त्यावर रसेलनं मिश्किल उत्तर दिलं. आपल्यावर दबाव होता हे कबूल करताना पत्नी मैदानावर सामना बघताना दबाव तर असतोच असं रसेल म्हणाला.VIDEO: उमा भारतींची गळाभेट, साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडूबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...