VIDEO : 6, 4, 6, 4, 4 उमेश यादवची धुलाई पाहा 90 सेकंदात

VIDEO : 6, 4, 6, 4, 4 उमेश यादवची धुलाई पाहा 90 सेकंदात

उमेश यादवनं आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा दिल्या.

  • Share this:

बंगळुरू, 04 मे : आयपीएलचा बारावा हंगाम संपण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तर, साखळी सामने सध्या शेवटच्या टप्प्यात आले आहे, त्यामुळं प्ले ऑफमधून पुढे उपांत्य फेरीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या सगळ्यातून आधीच बाहेर पडलेला संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ. बंगळुरू शनिवारी आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबाद विरोधात आपला शेवटचा सामना खेळला. मात्र, या हंगामात सर्वात वाईट खेळ हा विराटच्या सेनेचा झाला आहे. विराट सेना 14 सामन्यात गुणतालिकेत अगदी तळाला राहिला.

हैदराबाद विरोधात झालेल्या सामन्यात विराटनं 13 सामन्यांनंतर प्रथम टॉस जिंकत जणु एक विक्रमच केला. विराटनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत हैदराबादला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादनं दमदार सुरुवात केली.

हैदरबाकडून सलामीला आलेला रिध्दीमान साहा आणि मार्टिन गुपतील यांनी 46 धावांची भागीदारी केली, त्यानंतर उमेश यादवनं हैदराबादला पहिला झटका दिला. तीन ओव्हरमध्ये उमेश यादवनं किफायतशीर गोलंदाजी केली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन यानं उमेश यादवला धु-धु धुतलं.

उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये केननं 6,4,6,4 अश्या तब्बल 27 धावा दिल्या. यात एक नो-बॉल टाकत त्यानं फ्रि हिटही दिली.

Loading...या धावांच्या जोरावरच हैदराबादनं 175 धावांचा आकडा गाठला. कर्णधार केन विल्यमसननं एकहाती सामना सांभाळला. केननं 43 चेंडूत 70 धावा केल्या.यात उमेश यादवची शेवटची ओव्हर खुप महत्त्वाची ठरली. दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये उमेश यादवनं खुपच वाईट गोलंदाजी केली. यामुळं विराटही काहीसा नाराज पाहायला मिळाला.


VIDEO : किळसवाणा प्रकार, पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये जेवणात आढळले रक्ताने माखलेले बोळे!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 4, 2019 11:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...