IPL 2019 : चाहते म्हणतात...धोनीशिवाय CSK म्हणजे चार्जरविना मोबाईल

चेन्नई आतापर्यंत आपल्या घरच्या मैदानावर केवळ दोनवेळा पराभूत झाला आहे. विशेष म्हणजे दोन्हीही वेळा मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 08:32 AM IST

IPL 2019 : चाहते म्हणतात...धोनीशिवाय CSK म्हणजे चार्जरविना मोबाईल

चेन्नई, 27 एप्रिल : धोनीच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सनं चेन्नईला त्यांच्या घरच्याच मैदानावर नमवलं. बईने दिलेल्या 156 धावांच्य़ा आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 109 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुरली विजय वगळता इतर फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. विजय शंकरने 35 चेंडूत 38 धावा केल्या. सलामीवीर शेन वॉटसन मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सुरेश रैना, अंबाती रायडु, केदार जाधव आणि ध्रुव शौर्य हे फलंदाज लागोपाठ बाद झाले. विजय शंकरने एकाकी झुंज दिली.

दरम्यान, चेन्नईच्या या पराभवानं गुणतालिकेत त्यांना काही फरक पडला नसला तरी चेन्नईचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. तर, दुसरीकडं दुसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईच्या चाहत्यांनी या पराभवामुळं चेन्नईवर आपलं तोंडसुख घेतल आहे. ट्विटरवरती चेन्नई संघाला ट्रोल केलं जात आहे. काही चाहत्यांनी तर, धोनीशिवाय चेन्नईचा संघ म्हणजे चार्जरविना मोबाईल आहे. ज्याची बॅटरी कधीही डाऊन होऊ शकते.


Loading...


चेन्नई आतापर्यंत आपल्या घरच्या मैदानावर केवळ दोनवेळा पराभूत झाला आहे. विशेष म्हणजे दोन्हीही वेळा मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं आहे. याआधी 2015 साली मुंबईनं चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर नमवलं होतं.

चेपॉकवर रोहितच किंग

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा चेपॉकवर 6 सामने खेळला आहे. यातील दोन सामने डेक्कन चार्जर्स या संघासोबत, तर 4 सामने मुंबई संघासोबत खेळला आहे. दरम्यान या सहाही सामन्यात रोहित शर्मानं बाजी मारली आहे.रोहितच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवलं. आतापर्यंत 4 वेळा मुंबईनं चेन्नईला नमवलं आहे.


VIDEO: महापालिकेत राडा, शिवसैनिकाने अभियंत्याला बूट फेकून मारला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...