S M L

IPL-2019 : आयपीएलमधील यंदाचे सामने भारतात होणार का? अखेर सस्पेन्स संपला!

देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने हे सामना भारतातच होणार का, याबाबत अनिश्चितता होती.

News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2019 05:24 PM IST

IPL-2019 : आयपीएलमधील यंदाचे सामने भारतात होणार का? अखेर सस्पेन्स संपला!

नवी दिल्ली, 8 जानेवारी : देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने हे सामना भारतातच होणार का, याबाबत अनिश्चितता होती. पण आयपीएलचे यंदाच्या सीझनमधील सर्व सामने भारतातच होणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने दिली आहे.

आयपीएलच्या यंदाच्या सामन्यांना 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे.
आयपीएल आणि भारतातील निवडणुका

इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलला 2008 ला सुरुवात झाली. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकांवेळी आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी या लीगमधील सुरूवातीचे काही सामने युएईमध्ये झाले आणि त्यानंतर उर्वरित सामने भारतात खेळवण्यात आले.

Loading...

यावर्षीही ही लीग भारतात होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण आता अखेर हा सस्पेन्स संपला आहे. 23 मार्चपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात होईल.


VIDEO : ऑस्ट्रेलियात विराटच्या टीमचा नवा विक्रम; असं केलं जोरदार सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 05:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close