...तर धोनीवर झाली असती मोठी कारवाई, 'या' कारणामुळे बचावला

...तर धोनीवर झाली असती मोठी कारवाई, 'या' कारणामुळे बचावला

धोनीच्या त्या कृतीनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे तर काहींनी त्याचे समर्थनही केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : आयपीएलच्या 12 व्या हंगामात गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी शेवटच्या षटकात मैदानात आल्याने वाद निर्माण झाला आहे. धोनीच्या या कृतीबद्दल माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीकाही केली आहे. धोनीला याबद्दल सामन्याच्या मानधनातील 50 टक्के रकमेचा दंडही करण्यात आला. मात्र, या प्रकरणात असलेल्या ब्रूस ओक्सेनफोर्ड यांनीच धोनीची बाजू मांडली आहे. त्यामुळे धोनीवर होणारी मोठी कारवाई टळली.

गुरुवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात एका फुलटॉसवर नो बॉल दिल्यानंतर पुन्हा निर्णय बदलण्यात आला. यामुळे नाराज झालेला धोनी मैदानावर आला. लेग अंपायर ब्रूस ओक्सफोर्ड यांच्या जबाबानंतर मॅच रेफरींनी फक्त सामन्याच्या रकमेवर दंड सुनावला अन्यथा धोनीवर मोठी कारवाई होण्याची शक्यता होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर मॅच रेफरींसमोर ओक्सफोर्ड यांनी स्पष्ट केले की, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आल्याने आणि नो बॉल बद्दल चर्चा केल्याने आम्हाला वाईट वाटले नाही.

पंचांकडून धोनीची ही कृती त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय होता असं म्हटलं जात आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटूंनी धोनीच्या अशा प्रकारे मैदानावर जाण्यावर टीका केली जात आहे.

राजस्थानविरुद्ध शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या धोनीचा रुद्रावतार सर्वांना बघायला मिळाला. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनी 58 धावा करत बाद झाला. बेन स्टोक्सच्या या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल होता. तर तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्यानंतर चौथ्या चेंड़ूने वाद निर्माण झाला. पंचांनी पहिल्यांदा नो बॉल दिला. मात्र, स्क्वेअर लेगच्या पंचांनी नो बॉल नसल्याचेन सांगितले आणि दोन धावा दिल्या. यामुळे धोनी थेट मैदानात उतरून पंचांशी भिडला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर सेंटनरने षटकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

Loading...

मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 08:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...