IPL 2019 : ...तर पंतने मारलेला चेंडू अरबी समुद्रात पडला असता

ऋषभ पंतच्या 27 चेंडूत नाबाद 78 धावांच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मीमचा धुमाकूळ

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 08:45 AM IST

IPL 2019 : ...तर पंतने मारलेला चेंडू अरबी समुद्रात पडला असता

मुंबई, 25 मार्च : आयपीएलच्या 12 हंगामातील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात ऋषभ पंतने वानखेडे स्टेडियमवर केलेल्या चौफेर फटकेबाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. पंतच्या 27 चेंडूत नाबाद 78 धावांच्या तुफान खेळीच्या जोरावर दिल्लीने मुंबईसमोर 214 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीने हा सामना 37 धावांनी जिंकला.

दरम्यान, ऋषभ पंतच्या चौफेर फटकेबाजीचे नेटकऱ्यांनी जबरदस्त कौतुक केले. ऋषभ पंतने 78 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या फटकेबाजीनंतर ट्वीटरवर कौतुक सोहळाच सुरु झाला.ऋषभ पंतने त्याच्या खेळीत 7 गगनचुंबी षटकार मारले. यामध्ये त्याच्या एका हाताने जर इतके उंच षटकार मारत असेल तर दोन्ही हाताने मारलेला चेंडू अरबी समुद्रात पडेल असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.नेटिझन्सनी बॉलीवू़ड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन यांचे काही फोटो वापरुन ऋषभने कशी खेळी केली ते दाखवले आहे. याशिवाय ऋषभ पंत धोनीला पर्याय ठरु शकतो की नाही यावरही नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.विराट कोहलीनंतर ऋषभ पंत भारताचे भविष्य असल्याचेही काहींनी म्हटलं आहे.दिल्लीनं दिलेलं 214 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या मुंबईला लागोपाठ झटके बसत गेले. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 14 धावांवर बाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादवही लगेचच धावबाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही ईशांत शर्माने माघारी पाठवले. पोलार्डलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तर हार्दिक पांड्यानं आपले खातेही उघडले नाही. या दोघांनंतर कृणाल पांड्यांने 15 चेंडूत 32 धावा करत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला पण मोठे शॉट खेळण्याच्या नादात कृणालनं विकेट टाकली.प्रथम गोलंदाजी करताना मुंबईच्या संघाने शेवटच्या 20 चेंडूत तब्बल 90 धावा दिल्या. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी आक्रमक ठरली नाही. हार्दिक पांड्यांने आपल्या चार ओव्हरमध्ये 41 धावा देत कॉलिन इनग्राम या फलंदाजाला बाद केले. मात्र मुंबईला लसिथ मलिंगाची कमतरता जाणवली असणार. मुंबईचा पुढचा सामना शुक्रवारी बंगळुरू विरोधात चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.

VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 08:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close