चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सूर्यकुमार यादव

चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सूर्यकुमार यादव

सुर्यकुमार यादवनं 71 धावांची खेळी केली, पण यात चेन्नईच्या फलंदाजांच्या या चुका फायद्याच्या ठरल्या.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहज वियय मिळवत रोहित शर्माच्या मुंबई पलटननं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती, सूर्यकुमार यादवनं 54 चेंडूत 71 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईनं चेन्नईवर सहज विजय मिळवला.

दरम्यान या सामन्यात सूर्यकुमार यादव याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याच्या 71 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं सामना जिंकला. सामन्यानंतर त्यानं चांगली खेळी करण्यामागे नेमके काय कारण होते, हे स्पष्ट केले. सामन्यानंतर सुर्यकुमारनं, ''मी आक्रमक फलंदाजी न करता एकेरी आणि दुहेरी धाव काढण्याकडे जास्त भर दिला. म्हणून मी आमच्या संघाला विजयी मिळवून देणारी खेळी करू शकलो’’, असे त्यानं सांगितले.

वाचा- IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

दरम्यान हा पुरस्कार मिळाल्यानंतर सूर्यकुमारनं, “पहिल्या 3 फलंदाजांपैकी कोणीतरी जबाबदारीने खेळणे महत्वाचे होते. आजचा सामना हा आमच्यासाठी मोठा आणि महत्वाचा होता. त्यामुळे या सामन्यात विशेष कामगिरी करणे आवश्यक होते.” दरम्यान ”चेन्नईची फलंदाजीमध्ये झालेली बिकट अवस्था मी पाहिली म्हणूनच मी मैदानालगत फटके खेळत राहिलो. हवेत उंच फटके मारण्याचा मोह मी टाळला. त्याचा फायदा मला झाला’’, असे मत त्यानं व्यक्त केलं.

वाचा- IPL 2019 : चेन्नईविरोधात 'हा' होता रोहितचा मास्टर प्लॅन

प्ले ऑफमधील पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. दीपक चाहरच्या चेंडूवर अपील केल्यानंतर पंचानी रोहित शर्माला बाद दिले. त्यानंतर डीआरएसचा निर्णय रोहित शर्माने घेतला. त्यातही पंचांचा निर्णय़ योग्य असल्याने रोहित शर्मा बाद ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धडाक्यात सुरुवात केली. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात क्विंटन डीकॉक तंबूत परतला. त्याला हरभजनसिंगने 8 धावांवार बाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी 80 धावांची भागिदारी केली. या भागीदारीच्या जोरावर चेन्नईला नमवत मुंबईनं थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला.

वाचा- VIDEO : इतर संघांपेक्षा मुंबईची जास्त भीती? पाहा धोनी काय म्हणाला

VIDEO: यंदा राज्यात मध्यम पावसाची शक्यता, भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज

First published: May 8, 2019, 10:27 AM IST

ताज्या बातम्या