VIDEO : तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं मोडला स्वत:चाच 'हा' विक्रम

VIDEO : तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं मोडला स्वत:चाच 'हा' विक्रम

आयपीएलमधल्या सर्वात जास्त धावा करण्याऱ्या खेळाडूला डेल स्टेननं भोपळाही फोडू दिला नाही.

  • Share this:

बंगळुरू, 21 एप्रिल : अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर असेलल्या चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि तळाला असलेला बंगळुरू संघ यांच्यात आज एकतर्फी सामना होईल असे वाटत होते. परंतु तसे घडले नाही.

चेन्नईनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत बंगळुरूला 161 धावांवर रोखले. मात्र, बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसली तरी, गोलंदाजांनी त्यांची कसर भरुन काढली. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, सलामीला आलेल्या शेन वॉटसन आणि ड्युप्लेसीस यांना डेल स्टेननं सुरुवातही करु दिली नाही. आपल्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवरच स्टेननं चेन्नईला पहिला झटका दिला. डेल स्टेनला केवळ पाच धावांवर बाद केलं.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सुरेश रैनाकडून संघाच्या अपेक्षा होत्या. कारण आयपीएलमधल्या सर्वात जास्त धावा करण्याचा यादीत रैनाचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, डेल स्टेनच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून स्टेननं सुरेश रैनाचा त्रिफळा उडवला.

सुरेश रैना चक्क आपला भोपळा न फोडताही माघारी परतला. दरम्यान, 2013च्या अंतिम सामन्यानंतर सुरेश रैना आयपीएलमध्ये प्रथमच शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळं तब्बल 6 वर्षांनी सुरेश रैनानं आपला हा लाजीरवाणा विक्रम मोडला.दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरू संघाकडून पार्थिव पटेल वगळता कोणलाही चांगली फलंदाजी करता आली नाही. पटेलनं आयपीएलमधलं 16वं अर्धशतक पुर्ण केलं. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूनं 161पर्यंत मजल मारली.

VIDEO : 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

First published: April 21, 2019, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading