News18 Lokmat

गावस्करांनी IPL मधून शोधला वर्ल्डकपसाठी चौथ्या नंबरचा खेळाडू

भारतीय संघाच्या निवड समितीने य़ाआधीच आयपीएलमधील कामगिरीवर वर्ल्डकपसाठी निवड होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 02:28 PM IST

गावस्करांनी IPL मधून शोधला वर्ल्डकपसाठी चौथ्या नंबरचा खेळाडू

नवी दिल्ली, 13 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद हे आजही आपल्या वर्ल्डकप संघाबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटले होते की, आयपीएलमधील कामगिरी पाहून कोणत्याही खेळाडूला भारतीय संघात घेतले जाणार नाही. वर्ल्ड़कप 2019 साठी भारतीय संघ 15 एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहे.

एमएसके प्रसाद आणि विराट कोहली यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, वर्ल्डकपसाठी संघ निश्चित झाला आहे. फक्त एक किंवा दोन बदल करण्यात येतील. भारतासमोर सध्या चार नंबरला कोण खेळणार हाच मोठा प्रश्न आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मानेसुद्धा आयपीएलच्या कामगिरीचा वर्ल्डकप संघ निवडीवर फरक पडणार नाही असे सांगितले होते. मात्र, भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे की, आयपीएलमधील सध्याची कामगिरी पाहून निवड समितीने संघ निवडला पाहिजे.

भारताने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 13 एप्रिलला खेळला होता. अंबाती रायडु, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जास्त धावा केल्या नाहीत. त्यानंतर आयपीएल ही एकच स्पर्धा खेळली जात आहे. केएल राहुलला सध्या चौथ्या नंबरला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्याने आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना आतापर्यंत एक शतक आणि 3 अर्धशतके लगावली आहेत.

सुनील गावस्कर यांना वाटते की, खेळाडूंचा सध्याचा फॉर्म बघून त्यांना संधी दिली पाहिजे. चौथ्या नंबरवर केएल राहुलला निवडले पाहिजे. रायडु फॉर्ममध्ये दिसत नाही असेही ते म्हणाले.

Loading...

केअल राहुलने आय़पीएलमध्ये 7 सामन्यात 317 धावा केल्या आहेत. तसेच तो चौथ्या नंबरवर खेळला आहे. तसेच आता तो एकाग्रतेने फलंदाजी करताना दिसतो. त्याच्यात फटकेबाजी आणि संयम दोन्हीही आहे असंही गावस्कर म्हणाले.

VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...