...म्हणून रहाणेला राजस्थानच्या कर्णधार पदावरून हटवलं

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थानचं नेतृत्व स्टीव्हन स्मिथकडे सोपवण्यात आलं

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 03:57 PM IST

...म्हणून रहाणेला राजस्थानच्या कर्णधार पदावरून हटवलं

जयपूर, 20 एप्रिल : आयपीएलमध्ये राजस्थानच्या खराब कामगिरीचा अजिंक्य रहाणेला फटका बसला आहे. रहाणेला मुंबईविरुद्धच्या सामन्यात कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. पुढच्या सामन्यांमध्ये स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने या हंगामात 8 सामने खेळले असून फकत् दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. राजस्थान गुणतक्त्यात 7व्या क्रमांकावर आहे. राजस्थानचे प्रशिक्षक पॅडी अॅप्टन यांनी मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरच रहाणेच्या कर्णधारपदाबाबत विचार सुरू असल्याचे म्हटले होते. एक संघ म्हणून चांगली कामगिरी करण्यात राजस्थान अपयशी ठरत असल्याचं अॅप्टन म्हणाले होते.

IPL 2019 : शतकासाठी स्वार्थी झाला विराट, संघापेक्षा शतक महत्त्वाचे?

अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये फलंदाजीतही खराब कामगिरी केली आहे. त्याने 8 सामन्यात केवळ 201 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. टी 20 सामन्यात गेल्या दोन हंगामात सलामीला खेळणाऱ्या रहाणेचा स्ट्राइक रेटही कमीच आहे. कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जर रहाणेला अंतिम 11 मधून बाहेर काढले तर त्याबद्दलही आश्चर्य करण्यासारखे काही नसेल.

रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, खोतकरांच्या वक्तव्याने प्रचारसभेत हशा

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...