IPL 2019 : श्रेयस म्हणतो...मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है !

IPL 2019 : श्रेयस म्हणतो...मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है !

दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम सामन्यात मुंबईशी भिडेल.

  • Share this:

विशाषापट्टणम, 09 मे : दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्लीनं शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीनं अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात महत्त्वाची भुमिका बजावली ती युवा खेळाडूंनी. मुळातच युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी हैदराबाद विरोधात आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

हैदराबादवर मिळवलेल्या या विजयासह दिल्लीनं आता फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे. शुक्रवारी त्यांचा सामना चेन्नईशी होणार आहे. दरम्यान 163 धावांचा पाठलाग करताना धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 66 धावांची भागिदारी केली. धवनला बाद करून दीपक हूडाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ लागोपाठ बाद झाले. दरम्यान शेवटच्या काही षटकांत दिल्ली सहज सामना जिंकेल असं वाटत असताना, मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले त्यामुळं मैदानावर एकटा उभा होता तो, ऋषभ पंत.

पंतनं केवळ 21 चेंडूत 233.33च्या सरासरीनं 49 धावा केल्या यात त्यानं तब्बल 5 षटकारांची आतषबाजी होते. तर, केवळ 2 चौकारांचा समावेश होता. दरम्यान पंतचं सामना फिनीश करेल, असं वाटत असताना 49 धावांवर तो बाद झाला.

वाचा- मिश्राची 'ती' चूक दिल्लीला पडली असती महागात, पाहा VIDEO

वाचा- VIDEO : 2 चेंडूत 3 विकेट तरीही हॅट्ट्रिक नाही, पाहा क्रिकेटमधील अनोखी घटना

दरम्यान सामनवीर म्हणून घोषित केलेल्य पंतची सामन्यानंतर श्रेयस अय्यरनं मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतनं, “ मी सामना संपवाव अशी माझी इच्छा होती, त्यामुळं ती थोडा निराश झालो होतो. मात्र आम्ही सामना जिंकलो, यातच मी खुश आहे. आता आमचं लक्ष केवळ फायनल आहे. चेन्नईला हरवण्यासाठी रणनीती आखणं गरजेचे आहे’’, असे सांगितले. दरम्यान श्रेयसनं पंतच्या खेळीची प्रशंसा करत, रणवीर सिंहच्या गली बॉय या सिनेमातील गाण्याची ओळ पंतला समर्पित केलं. श्रेयस सामन्यानंतर पंतला उद्देशुन, मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है, असं म्हणाला.

वाचा- VIDEO : गुप्टिलचा षटकार पाहून दिल्लीच्या कर्णधाराचे डोळे दिपले

दरम्यान आता दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम सामन्यात मुंबईशी भिडेल.

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

First published: May 9, 2019, 11:47 AM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading