IPL 2019 : ज्यु. वॉटसन म्हणतो...बाबा नाही तर 'हा' खेळाडू आवडता

IPL 2019 : ज्यु. वॉटसन म्हणतो...बाबा नाही तर 'हा' खेळाडू आवडता

शेन वॉटसननं सनरायजर्स हैदराबाद विरोधात 96 धावांची तुफान खेळी केली.

  • Share this:

चेन्नई, 24 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात पहिल्या सामन्यापासून धावांसाठी संघर्ष करणारा शेन वॉटसनला अखेर सुर गवसला. सनरायजर्स हैदराबाद विरोधात वॉटसननं 96 धावांची तुफान खेळी केली. त्याच्या या खेळामुळं चेन्नई संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.

गेल्या 10 सामन्यांमधली वॉटसनची ही सर्वश्रेष्ठ पारी ठरली आहे. दरम्यान या सामन्यानंतर वॉटसननं ज्युनिअर वॉटसनची मुलाखत घेतली. आयपीएलनं आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ टाकला आहे. यात वॉटसननं आपल्या मुलाला विचारलं की, मी सोडून तु कोणत्या खेळाडूचा फॅन आहेस. त्यावर ज्यु. वॉटसननं म्हणजेच विलियमनं धोनीच नाव घेतलं. जेव्हा वॉटसननं त्याला धोनी आवडण्यामागचं कारण विचारल्यावर, त्यानं धोनी खुप चांगला आहे, आणि तो नेहमी षटकार लगावतो असं उत्तर दिलं.

विलियम आपल्या बाबांचा खुप मोठा फॅन आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये सामने पाहण्यासाठी तो शाळा सोडून आला आहे. हैदराबाद विरोधात वॉटसननं हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ९६ धावा केल्या.

भुवनेश्वर कुमारने वॉटसनला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. अवघ्या ४ धावांनी वॉटसनचं शतक हुकलं. त्याच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक झालं. पण त्याला विशेष स्तुती ऐकायला मिळाली ती आपल्या मुलाकडून. वॉटसनच्या या खेळीमुळं चेन्नईच्या संघाची सलामीची चिंता मिटली आहे.

VIDEO : गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार, नवरदेवाचा उखाणा व्हायरल

First published: April 24, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading