IPL 2019 : वॅटसनच्या षटकारानंतर घ्यावी लागली पोलिसांची मदत

शेन वॅटसनने केलेल्या 44 धावांच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवला.

  • Share this:

आयपीएलमधील पाचवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 147 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईला शेन वॅटसनने चांगली सुरुवात करुन दिली.

चेन्नईचा संघ खेळत असताना सातव्या षटकात दिल्लीचा गोलंदाज अमित मिश्राच्या षटकात वॅटसनची बॅट चांगलीच तळपली. त्याने अमित मिश्राच्या गोलंदाजीवर दोन उत्तुंग षटकार खेचले.

यातील एक षटकार इतका उंच होता की चेंडू थेट स्टेडियममधील प्रेक्षकांच्या हातात पोहचलाय यावेळी प्रेक्षकांनी तिथेच खेळायला सुरुवात केली.

Loading...

दरम्यानच्या काळात इकडे मैदानावर शेन वॅटसन पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होता. मात्र, गोलंदाजाकडे चेंडू नव्हता. तेव्हा पंचांनी प्रेक्षकांना चेंडू परत देण्याची विनंती केली.

अतिउत्साही प्रेक्षकांनी पंचानी चेंडू मागितला याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी अंपायरने नवा चेंडू घेऊन खेळ सुरु केला. तर तिकडे प्रेक्षक गॅलरीत पोलिस चेंडू शोधण्यासाठी पोहचले.

त्यानंतरच्या चेंडूवर वॅटसन बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात पुढे गेलेल्या वॅटसनला ऋषभ पंतने यष्टीचित केलं.

वॅटसनने 26 चेंडूत 44 धावांची खेळी केली. याच जोरावर चेन्नईने सामना जिंकला.

तर ख्रिस गेल 296 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 02:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...