IPL 2019 : शाहरुखकडे आहेत फक्त 180 मिनिटं...

IPL 2019 : शाहरुखकडे आहेत फक्त 180 मिनिटं...

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाताचा संघ सध्या 10 गुणांसह 6व्या स्थानावर आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : तुम्हाला शाहरुख खानचा हॉकी या खेळावरती असलेला प्रसिध्द सिनेमा चक दे इंडिया माहिती असलेच. या सिनेमात अगदी शेवटच्या काही मिनिटांत शाहरुख खानचा एक जगप्रसिद्ध डायलॉग आहे. यामध्ये शाहरुख अंतिम सामन्याआधी महिला खेळाडूंना एका डॉयलॉगनं प्रोत्साहित करतो. तो डॉयलॉग म्हणजे, ''ये 70 मिनिट सिर्फ 70 मिनिट तुम्हारी जिंदगी बदल सकती है''. दरम्यान या डॉयलॉगसारखच शाहरुखच्या आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची हालत झाली आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात सध्या प्ले ऑफसाठी सर्व संघांमध्ये चुरस सुरु आहे. याआधी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी प्ले ऑफमध्ये एण्ट्री केली आहे. त्यामुळं आता केवळ दोन जागांसाठी पाच संघांमध्ये लढत सुरु आहे. आज मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यात वानखेडेवर सामना होत आहे. मात्र या सामन्यावर इतर संघांच्याही नजरा खिळल्या आहे. दरम्यान हा सामना मुंबई संघानं जिंकला तर, ते थेट प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. मुंबई सध्या 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आजचा सामना त्यांनी जिंकला तर ते दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतील.

तर, हैदराबादचा संघ हरला तर कोलकाताच्या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची एक संधी मिळेल. तर, दिल्ली कॅपिटल्सलाही राजस्थान विरुद्धचा आपला शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. जर आज मुंबईनं सामना गमावला आणि त्यानंतर कोलकाता विरोधातही मुंबई हरली तर मुंबईच्या प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी हुकणार आहे. कोलकाताचा सध्याचा रनरेट 0.1 आहे. त्यांना मुंबईच्या पराभवाचा थेट फायदा होईल.

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाताचा संघ सध्या 10 गुणांसह 6व्या स्थानावर आहे. दरम्यान मुंबई विरोधात मागील सामना त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकला असला तरी, मुंबईचा पुढील सामना हा मुंबई संघासोबत होणार आहे. दरम्यान बंगळुरू संघ याआधीच स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. मात्र आज तर हैदराबादच्या संघाला मुंबईकडून पराभव स्विकारावा लागला तर, राजस्थान रॉयल्सही आयपीएलमधून बाहेर होणार आहे.

VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात...

First published: May 2, 2019, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading