IPL 2019 : पहिला सामना CSKvsRCB, वेळापत्रक जाहीर

IPL 2019 : पहिला सामना CSKvsRCB, वेळापत्रक जाहीर

23 मार्चला आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात, गतविजेत्या चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणार पहिला सामना.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : इंडियन प्रिमीयर लिगच्या 2019 सिझनच्या पहिल्या दोन आठवड्यात खेळल्या जाणाऱ्या टी20 सामन्यांचे वेळापत्रक IPL च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार पहिला टी20 सामना 23 मार्चला CSKvsRCB यांच्यात चेन्नईत होणार आहे.

23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत 17 टी20 सामने होणार आहेत. आयपीएलच्या या हंगामात 8 संघ एकमेकांना भिडणार आहेत. गेल्यावर्षी सनरायझर्स हैदराबादला हरवून विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.

देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने हे सामने भारतातच होणार का, याबाबत अनिश्चितता होती. पण आता वेळापत्रकानुसार पहिल्या दोन आठवड्यातील सामने भारतातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 23 मार्चपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात होईल.

इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलला 2008 ला सुरुवात झाली. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकांवेळी आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी या लीगमधील सुरूवातीचे काही सामने युएईमध्ये झाले आणि त्यानंतर उर्वरित सामने भारतात खेळवण्यात आले.

First published: February 19, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading