हॅट्ट्रिक करणारा खेळाडू भारतीयाकडून शिकतोय गोलंदाजीची 'ट्रिक'

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सॅम करनने यंदाच्या आयपीएलमधील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 06:37 PM IST

हॅट्ट्रिक करणारा खेळाडू भारतीयाकडून शिकतोय गोलंदाजीची 'ट्रिक'

नवी दिल्ली, 8 एप्रिल : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन त्याच्या इनस्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या या 20 वर्षीय खेळाडूने यंदा पहिली हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

सॅम करनने गेल्या वर्षी भारताविरुद्ध एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करत सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 7.2 कोटी रुपये देऊन संघात घेते. त्याने दिल्लीविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवून निवड सार्थ ठरवली.सॅम करनने पीटीआयशी बोलताना सांगितले की, माझा पहिल्या आयपीएलमधील आतापर्यंतचा अनुभव चांगला राहिला आहे. भारतात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये तेही दिग्गज खेळाडूंसोबत खेळणं यातून भरपूर शिकायला मिळत आहे.

Loading...

वाचा : 76 चेंडूत 210 धावा, 24 चौकार आणि 13 षटकार

आयपीएलमध्ये येण्यापूर्वी सॅम करनने इंग्लंडमधील सहकाऱ्यांशी चर्चा केली होती. या लीगमध्ये खेळताना असलेला दबाव आणि इतर गोष्टींची माहिती घेतली होती. पंजाबचा कर्णधार आर अश्विन आणि केएल राहुलसोबत बोलायला आवडतं तसेच भारताचा स्विंग गोलंदाज मोहम्मद शमीकडून धडे घेत असल्याचं सॅमने सांगितलं आहे.

वाचा : IPL : 'या' 8 खेळाडूंना मिळू शकते वर्ल्डकपचे तिकीट

झिम्बॉम्बेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू केव्हिन करनचा मुलगा असलेल्या सॅमने म्हटले की, मी शमीची गोलंदाजी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्याकडून भारतात कसे खेळायचे याचा अभ्यास करत आहे. आयपीएलच्या शेवटी मी एक चांगला गोलंदाज होईन असंही सॅमने म्हटलं.

वाचा : IPL मध्ये तिसऱ्यांदा स्टंपने केला घोटाळा, फलंदाज बादच होईना, पाहा VIDEO

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...