Home /News /sport /

VIDEO : सचिनचं शाहरुखला ओपन चॅलेंज, म्हणाला...

VIDEO : सचिनचं शाहरुखला ओपन चॅलेंज, म्हणाला...

प्लेऑफमधील तीन संघ ठरले असून चौथा संघ कोणता? हे मुंबई आणि कोलकाता यांच्या सामन्यानंतर ठरणार आहे.

    मुंबई, 05 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना आज आहे.प्लेऑफमधील तीन संघ ठरले असून चौथा संघ कोणता? हे मुंबई आणि कोलकाता यांच्या सामन्यानंतर ठरणार आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर चौथ्या स्थानावर कोण हे निश्चित होईल. चेन्नई, दिल्ली आणि मुंबईनं प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. कोलकाता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. सनरायझर्स हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने 13 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. मात्र हा सामना मुंबईसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण मुंबईनं हा सामना जिंकला तर, मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिला किंवा दुसरा क्रमांक गाठू शकते. यामुळं प्ले ऑफमध्ये जरी मुंबई एक सामना हरली तरी त्यांना पुन्हा अंतिम फेरी गाठण्यासाठी एक संधी मिळेल. त्यामुळं मुंबई हा सामना जिंकण्यासाठी पर्यंत करेल. तसेच साखळी फेरीतला मुंबईचा वानखेडेवरचा हा शेवटचा सामना असेल. दरम्यान या सामन्याआधी सचिननं आपल्या ट्विटरवरुन शाहरुख खानला थेट आव्हान दिलं आहे. या व्हिडिओत सचिन, “नमस्कार मुंबईकर, कस काय अशी मराठीत सुरुवात करुन, मुंबई संघाला या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा असून मुंबईकरांनी आपल्या संघाला सपोर्ट करावा’’ असे आव्हानही केलं. दरम्यान मुंबईच्या या विजयावर हैदराबादचं भवितव्यही अवलंबुन आहे. कारण मुंबईने जर मोठ्या फरकाने कोलकाताला पराभूत केले तर सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. असे झाल्यास 12 गुण मिळवूनही प्लेऑफ गाठणारा हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात पहिलाच संघ ठरू शकतो. SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'
    First published:

    Tags: Mumbai Indians, Shahrukh khan

    पुढील बातम्या