RR vs SRH : राजस्थानने गड राखला, हैदराबादवर 7 गडी राखून विजय

हैदराबादने दिलेल्या 161 धावांचे आव्हान राजस्थानने 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 11:32 PM IST

RR vs SRH : राजस्थानने गड राखला, हैदराबादवर 7 गडी राखून विजय

जयपूर, 27 एप्रिल : हैदराबादने दिलेलं 161 धावांचं आव्हान राजस्थानने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. सलामीवीरांनी केलेल्या 78 धावांच्या भागिदारीच्या जोरावर राजस्थानने 7 गडी राखून विजय मिळवला. रहाणेने 34 चेंडूत 39 धावा केल्या. तर लिविंगस्टनने 26 चेंडूत 44 धावांची तुफान खेळी केली. राशिद खानने लिविंगस्टनला बाद करून राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर शाकिब अल हसनने रहाणेला बाद केलं. त्यानंतर संजू सॅमसन आणि स्टीव्हन स्मिथ यांनी 55 धावांची भागिदारी केली.खलील अहमदच्या गोलंदाजीवर स्मिथ बाद झाला. त्याने 16 चेंडूत 22 धावा केल्या. संजू सॅमसनने 32 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. अॅश्टन टर्नर 3 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने हैदराबादला 160 धावांवर रोखले. हैदराबादचा सलामीवीर केन विलियम्सनला चौथ्या षटकात श्रेयस गोपालने बाद केलं. हैदराबादने 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावा केल्या. मनिष पांडेने सर्वाधिक 61 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 37 धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र समाधानकारक धावा काढता आल्या नाहीत. शाकिब अल हसन 9 धावांवर तर रिद्धिमान साहा 5 धावांवर बाद झाले. दीपक हुड्डाला खातेही खोलता आले नाही. विजय शंकर 8 धावा काढून बाद झाला. राशिद खान 17 आणि सिद्धार्थ कौल 1 धावेवर नाबाद राहिले. राजस्थानकडून श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट, वरूण अॅरॉन आणि ओशाने थॉमस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

वाचा : World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात जिंकणार कोण? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

आयपीएल गुणतक्त्यात राजस्थान सातव्या स्थानावर असून हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. राजस्थानने आजच्या सामन्यात संघात दोन बदल केले. यात अॅश्टन टर्नर आणि लिविंगस्टोनला संघात घेतलं आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स मायदेशी परतल्याने हा बदल करण्यात आला आहेत. तर हैदराबादने केन विलियम्सन, सिद्धार्थ कौल आणि दीपक हुड्डा यांना पुन्हा संधी दिली आहे. तर रिद्धिमान साहा यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळत आहे.

वाचा : IPL 2019 : धोनीची कमाल, वडीलांनंतर 19 वर्षांनी मुलाला केलं बाद

Loading...

...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 11:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...