KKR चा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, स्मिथचे अर्धशतक व्यर्थ

राजस्थान रॉयल्सने दिलेले आव्हान कोलकाताने 13.5 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 11:01 PM IST

KKR चा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, स्मिथचे अर्धशतक व्यर्थ

जयपूर, 6 एप्रिल : राजस्थान रॉयल्सने दिलेले 140 धावांचे आव्हान केकेआरने 13.5 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करून यंदाच्या आयपीएलमधील चौथा विजय नोंदवला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले.

केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला . स्टीव्ह स्मिथच्या नाबाद 73 धावांच्या जोरावर राजस्थानने केकेआरला 140 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. सुनिल नरेन आणि ख्रिस लिन यांनी 4.1 षटकांत संघाच्या 50 धावा केल्या. सुनिल नरेनला बाद करून श्रेयस गोपालने ही जोडी फोडली. दोघांनी 91 धावांची भागिदारी केली. सुनिलने 25 चेंडूत 47 धावा केल्या. तर ख्रिस लिनने 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पा आणि शुभमन गिलने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

चौथ्या षटकात केकेआरच्या दोन्ही सलामीवीरांना एकाच षटकात जीवदान मिळाले. राहुल त्रिपाठीने सुनिल नरेनचा झेल सोपा झेल सोडला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर ख्रिस लिन बोल्ड झाला. धवल कुलकर्णीने टाकलेला चेंडू स्टंपला लागला आणि मागे चौकार गेला. मात्र, यावेळी बेल्स न पडल्याने लिन बाद झाला नाही. दरम्यान, चेंडू स्टंपला लागला तेव्हा बेल्स हलल्यावर स्टंपची लाइट लाग KKR चा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, स्मिथचे अर्धशतक व्यर्थ KKR चा राजस्थानवर 8 गडी राखून विजय, स्मिथचे अर्धशतक व्यर्थल्याने राजस्थानच्या खेळाडूंनी लिन बाद झाल्याने थोडा जल्लोष केला. पण नंतर त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 3 बाद 139 धावा केल्या. यात स्टीव्हन स्मिथने 59 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कर्णधार रहाणेला 5 धावा करता आल्या. जोस बटलरने 34 चेंडूत 37 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. राहुल त्रिपाठी 6 धावा काढून बाद झाला. तर बेन स्टोक्स 7 धावांवर नाबाद राहिला. केकेआरकडून हॅरि गर्नीने 2 विकेट घेतल्या. त्याचा आयपीएलमधील पहिलाच सामना आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली.

<strong>VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'</strong>

Loading...

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-359640" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzU5NjQw/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...