IPL 2019 : ‘इलाका तुम्हारा, धमाका हमारा’; रोहित vs धोनी वॉर

IPL 2019 : ‘इलाका तुम्हारा, धमाका हमारा’; रोहित vs धोनी वॉर

सध्या ट्विटरवर रोहित विरुद्ध धोनी असा सामना पाहायला मिळत आहे.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : मुंबई इंडियन्सनं पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईवर 6 विकेटनं विजय मिळवला. दरम्यान या विजयासह मुंबईनं थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात चेन्नईला नमवतं, सगल चारवेळा चेन्नईला नमवण्याचा विक्रम मुंबईनं केला आहे. यामुळं सध्या ट्विटरवर रोहित विरुद्ध धोनी असा सामना पाहायला मिळत आहे.

दरम्यान धोनीच्या चेन्नई संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. आज क्वालिफायरचा दुसरा सामना दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात होणार . या सामन्यात जो संघ बाजी मारेल, त्या संघाचा सामना चेन्नईशी होणार आहे. त्यामुळं धोनीला अजुनही फायनलला पोहचण्याची संधी आहे. दरम्यान क्वालिफायर विरोधात पराभव मिळाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी चेन्नईला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.चेपॉकवर मुंबईनं केला चेन्नईचा रेकॉर्ड खराब

चेन्नईची सगळ्यात मोठी ताकद आहे, त्यांचं होमग्राऊंड म्हणजेच चेपॉक मैदान. आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईवर विजय मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. 21 सामन्यात चेन्नईनं 18 सामन्यात विजय मिळवला आहे तर, 3 सामन्यात पराभव मिळाला आहे. तीनही वेळा मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं आहे.

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉकदरम्यान काही चाहत्यांनी हा सामना अटीतटीचा होणार अशी अपेक्षा असताना, या सामन्यात चेन्नईनं चांगली कामगिरी केली नाही त्यामुळं हा सामना एकतर्फी झाला. यावरही मिम्स बनवलं.चेन्नईवर सलग 4 सामन्यात विजय

चेन्नईच्या विरोधात सलग 4 सामन्यात विजय मिळवत मुंबईनं एक रेकॉर्ड केला आहे. याआधी कोणत्याही संघाला ही कमाल करता आलेली नाही. मुंबईनं मागच्या हंगामातही चेन्नईला पराभूत केलं होतं.

2018- आठ विकेटनं विजय

2019- 37 धावांनी विजय

2016-46 धावांनी विजय

2019-6 विकेटनं विजय


तर, या हंगामात एकूण 2 वेळा लीग स्टेजमध्ये समोरासमोर आले होते, त्या दोन्ही सामन्यात मुंबईनं चेन्नईला भुईसपाट केलं होतं. दरम्यान पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईनं चेन्नईला 6 विकेटनं हरवलं.


वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव


पैशांची मागणी करणाऱ्या तरुणाला महिलेनं चपलेनं झोडपलं पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 12:40 PM IST

ताज्या बातम्या