VIDEO : बाप-लेकीचं अनोखं नात, अर्धशतकानंतर रोहितचं डॅडी सेलिब्रेशन

VIDEO : बाप-लेकीचं अनोखं नात, अर्धशतकानंतर रोहितचं डॅडी सेलिब्रेशन

पराभवानंतर मुंबईनं सलग सामने जिंकले आणि थेट प्ले ऑफमध्ये एण्ट्री घेतली. एवढचं नाही तर, गुणतालिकेत थेट अव्वल स्थानही गाठलं.

  • Share this:

मुंबई, 06 मे : तीन वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सुरुवात पराभवानं केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये तर एण्ट्री घेतलीच पण गुणतालिकेत थेट अव्वल स्थानही गाठलं. रविवारी रोहित शर्माच्या पलटननं कोलकाता विरोधात आपला शेवटचा साखळी सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळला. यात कर्णधार रोहित शर्मानं नाबाद 55 धावांची खेळी केली. या हंगामातलं हे त्याच दुसरं अर्धशतक आहे.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकत मुंबईनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकाताला 134 धावात रोखलं. दरम्यान या धावासंख्येचा पाठलाग करताना, रोहितनं अतिशय संयमी फलंदाजी करत नाबाद 55 धावा केल्या आणि 16.1 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला. सामन्यानंतर रोहितनं मी हे अर्धशतक माझ्या मुलीला समर्पित केलं. तसेच, “माझी मुलगी मला प्रत्येक सामन्यात चीअर करण्यासाठी आली आहे. पण मला जास्त धावा करता आल्या नाहीत. आज अर्धशतक केल्यामुळं मला आनंद झाला. पण त्यावेळी समायरा मात्र झोपली होती’’, असं सांगितलं.

सामन्यानंतर रोहित आपल्या मुलीला घेऊन थेट मैदानावर पोहचला, आणि तिच्यासोबत मैदानात बसूनच खेळू लागला. एवढचं नाही तर अर्धशतकानंतरही त्यानं अनोखं डॅडी सेलिब्रेशन केलं.

मुंबई आणि कोलकाता यांच्यातील झालेल्या सामन्यामुळं आयपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमधील संघांचा निर्णय झाला आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्क केलं आहे, मुंबईने 18 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे चेन्नई आणि दिल्ली आहे. तर 12 गुण मिळवून हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईला फायनलला पोहचण्याासाठी दोन संधी मिळतील. क्वालिफायर 1 मध्ये जिंकल्यास त्यांना थेट फायनलचे तिकिट मिळेल. जर पराभूत झाले तर त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळून पुन्हा फायनलला पोहचण्याची संधी असेल. मुंबई पहिल्यांदा 2013 मध्ये क्वालिफायर 1 मध्ये खेळली होती. तेव्हा चेन्नईला पराभूत करून मुंबईने फायनलला धडक मारली. तर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून फायनलला प्रवेश केला. अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला 23 धावांनी पराभूत करून पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यामुळं यंदाही याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी मुंबई उत्सुक आहे.

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'च्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवारावर हल्ला

First published: May 6, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading