IPL 2019 : रोहितसमोर धोनी 'फेल', क्वालिफायरमध्ये हरवताच केला ‘हा’ विक्रम

IPL 2019 : रोहितसमोर धोनी 'फेल', क्वालिफायरमध्ये हरवताच केला ‘हा’ विक्रम

चेन्नईला नमवत मुंबईनं एक असा विक्रम केला, जो याआधी कोणालाही जमलं नाही.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहज वियय मिळवत रोहित शर्माच्या मुंबई पलटननं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईवर 6 विकेटनं विजय मिळवत फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. चेन्नईनं हा सामना गमावला असला तरी, त्यांना अंतिम फेरी गाठण्याची एक संधी मिळणार आहे. मात्र मुंबई इंडियन्सनं चेन्नईला पराभूत करत आयपीएलमध्ये एक विक्रम केला.

प्ले ऑफमधील पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. दीपक चाहरच्या चेंडूवर अपील केल्यानंतर पंचानी रोहित शर्माला बाद दिले. त्यानंतर डीआरएसचा निर्णय रोहित शर्माने घेतला. त्यातही पंचांचा निर्णय़ योग्य असल्याने रोहित शर्मा बाद ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धडाक्यात सुरुवात केली. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. दरम्यान या सामन्यात सूर्यकुमार यादव याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याच्या 71 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं सामना जिंकला.

वाचा- IPL 2019 : चेन्नईविरोधात 'हा' होता रोहितचा मास्टर प्लॅन

चेन्नईवर सलग 4 सामन्यात विजय

चेन्नईच्या विरोधात सलग 4 सामन्यात विजय मिळवत मुंबईनं एक रेकॉर्ड केला आहे. याआधी कोणत्याही संघाला ही कमाल करता आलेली नाही. मुंबईनं मागच्या हंगामातही चेन्नईला पराभूत केलं होतं. तर, या हंगामात एकूण 2 वेळा लीग स्टेजमध्ये समोरासमोर आले होते, त्या दोन्ही सामन्यात मुंबईनं चेन्नईला भुईसपाट केलं होतं. दरम्यान पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईनं चेन्नईला 6 विकेटनं हरवलं.

2018- आठ विकेटनं विजय

2019- 37 धावांनी विजय

2016-46 धावांनी विजय

2019-6 विकेटनं विजय

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

चेपॉकवर मुंबईनं केला चेन्नईचा रेकॉर्ड खराब

चेन्नईची सगळ्यात मोठी ताकद आहे, त्यांचं होमग्राऊंड म्हणजेच चेपॉक मैदान. आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईवर विजय मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. 21 सामन्यात चेन्नईनं 18 सामन्यात विजय मिळवला आहे तर, 3 सामन्यात पराभव मिळाला आहे. तीनही वेळा मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं आहे.

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

पैशांची मागणी करणाऱ्या तरुणाला महिलेनं चपलेनं झोडपलं पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading