MI vs CSK : फायनलच्याआधी रोहित झाला भावूक, पाहा VIDEO

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईनं तीनवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. दरम्या त्याचा हा प्रवास त्यानं एका व्हिडिओत उलघडला.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 05:10 PM IST

MI vs CSK : फायनलच्याआधी रोहित झाला भावूक, पाहा VIDEO

हैदराबाद, 12 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.

मुंबई आणि चेन्नई तीन वेळा फायनलला एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये मुंबईने दोनवेळा तर चेन्नईने एकवेळा विजय मिळवला आहे. यामुळे मुंबईचे पारडे जड असून चेन्नईला विजय मिळवणं आव्हानात्मक असेल.

दरम्यान आपल्या चौथ्या विजयासाठी उत्सुक असलेला रोहित फायनलच्या सामन्याआझी चिंतेत असला तरी, तो खुप भावूक झाला होता. या सामन्यापूर्वी आयपीएलनं टाकलेल्या एका व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झालेला पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये रोहितनं आपल्या तीन वर्षांच्या आयपीएल विजेतेपदाची उजळणी केली. यात त्यानं मुंबई इंडियन्सच्या मागील तीन जेतेपदांमधील अविश्वसनीय क्षण सांगितले आणि संघाच्या थ्री पिलर्सचेही आभार मानले.


मुंबई आणि चेन्नई यांच्यात तीन वेळा आयपीएल फायनल झाली आहे. दरम्यान, चेन्नईनं 2010च्या फायनलमध्ये मुंबईला 22 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईनं चेन्नईचा 23 धावांनी, तर 2015 मध्ये कोलकातावरच चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे. चेन्नईनं आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे.

Loading...


चेन्नई विरोधात सर्वात चांगलं प्रदर्शन

आयपीएलमधला सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांच्यातला. दरम्यान या द्वंद्व युध्दात मुंबईचं प्रदर्शन जास्त चांगलं आहे. दोन्ही संघांनी एकूण 27 सामने खेळले आहेत. यात मुंबईनं 16 तर चेन्नईनं 11वेळा सामना जिंकला आहे. त्यामुळं जर चेन्नई अंतिम सामन्यात पोहचला तर, मुंबई फायनल जिंकू शकते.

अंतिम सामन्यातला शानदार रेकॉर्ड

2013मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या सहा वर्षात सर्वात जास्त यश मिळवलेला संघ आहे. मुंबईच्या संघानं 2013, 2015, 2017 अशी तीन विजेतेपदं मिळवली आहेत. त्यानंतर यंदा मुंबईच्या संघानं अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एवढचं नाही तर मुंबईच्या संघाची अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबईचा संघ एकूण 4 वेळा अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यात 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. तर, चेन्नईनं 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015 आणि 2018मध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या संघानं केवळ तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे.

वाचा- मुंबईच्या विजेतेपदासाठी धोनीचा 'चॅम्पियन' उतरणार मैदानात?

वाचा- MI vs CSK : ‘या’ खेळाडूचा वाढदिवस मुंबईसाठी ठरणार लकी ?

वाचा- 'शर्माजी का बेटा' फायनलसाठी चेन्नईचा 'लक फॅक्टर' ठरणार?


VIDEO : राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...