नवी दिल्ली, 04 मे : सध्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात सर्व संघाचं लक्ष लागलं आहे ते गुणतालिकेकडं. पहिले चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत, त्यामुळं पहिल्या चार संघात येण्यासाठी संघांची चढाओढ सुरु आहे.
दरम्यान, आयपीएलच्या बाराव्या हंगामात सध्या राज्य सुरु आहे ते युवा खेळाडूंच. याआधी पंजाबविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलनं तुफानी फलंदाजी केली. तर, आज दिल्ली आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात या 17 वर्षीय फलंदाजानं सगळ्यांची झोप उडाली. आसामच्या रियान परागनं अर्धशतकी खेळी करत, राजस्थानच्या संघाला 100चा आकडा पार करुन दिला.
रियानं आपल्या 49 चेंडुत आपलं अर्धशतक पुर्ण केलं. आणि हे अर्धशतक पुर्ण करताच त्यानं आपल्या नावावर एक विक्रम करुन घेतला. हा विक्रम म्हणजे, रियान सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा फलंदाज ठरला असता, तर अर्धशतकी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज झाला आहे.
दरम्यान याआधी राहुल द्रविडचे शिष्य असलेले संजु सॅमसन, पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी हा विक्रम केला आहे. 2013 साली संजू सॅमसननं तर, 2018मध्ये पृथ्वी शॉनं वयाच्या 18व्या वर्षी अर्धशतक ठोकलं होतं. तर रियानं 17 वर्ष 175 दिवसांनी आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकलं.
#FunFact
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 4, 2019
Youngest players to score a Vivo @IPL 5⃣0⃣
Riyan Parag - 1⃣7⃣y 175d 😎
Sanju Samson 18y 169d
Prithvi Shaw 18y 169d
Rishabh Pant 18y 237d
All 4 of them are playing today. #DCvRR #RR #HallaBol pic.twitter.com/qOcZZ2VrMg
तर, याआधी रियाननं 17 वर्ष 152 दिवसांत राजस्थानकडून पदार्पण केलं होतं. आसाम सारख्या छोट्याशा राज्यात स्थायिक असलेल्या रियाननं वयाच्या 15व्या वर्षी स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. हैदराबादच्या विरोधात त्यानं आपलं पदार्पण केलं. रियान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला आदर्श मानतो. तो फलंदाजीबरोबर लेग ब्रेक गोलंदाजी करतो. रियानची आयपीएलच्या बाराव्या हंगामातील कामगिरी चांगली असून, त्यानं 7 सामन्यात 126.98च्या स्ट्राईक रेटनं 160 धावा केल्या आहेत. यात आजच्या अर्धशतकी खेळीचाही समावेश आहे.
VIDEO : राहुल गांधींनी 'त्या' कंपनीसाठी अमिताभ बच्चनच्या भावाचा पत्ता दिला, जेटलींचा आरोप