IPL 2019 : आता तरी वर्ल्ड कप संघात घेणार का?, ऋषभ पंतच्या खेळीवर दिग्गजांचा सवाल

IPL 2019 : आता तरी वर्ल्ड कप संघात घेणार का?, ऋषभ पंतच्या खेळीवर दिग्गजांचा सवाल

पंतनं केवळ 21 चेंडूत 233.33च्या सरासरीनं 49 धावा केल्या यात त्यानं तब्बल 5 षटकारांची आतषबाजी केली.

  • Share this:

विशाषापट्टणम, 09 मे : दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्लीनं शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीनं अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात महत्त्वाची भुमिका बजावली ती युवा खेळाडूंनी. मुळातच युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी हैदराबाद विरोधात आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

हैदराबादवर मिळवलेल्या या विजयासह दिल्लीनं आता फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे. शुक्रवारी त्यांचा सामना चेन्नईशी होणार आहे. दरम्यान 163 धावांचा पाठलाग करताना धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 66 धावांची भागिदारी केली. धवनला बाद करून दीपक हूडाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ लागोपाठ बाद झाले. दरम्यान शेवटच्या काही षटकांत दिल्ली सहज सामना जिंकेल असं वाटत असताना, मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले त्यामुळं मैदानावर एकटा उभा होता तो, ऋषभ पंत.

पंतनं केवळ 21 चेंडूत 233.33च्या सरासरीनं 49 धावा केल्या यात त्यानं तब्बल 5 षटकारांची आतषबाजी होते. तर, केवळ 2 चौकारांचा समावेश होता. दरम्यान पंतचं सामना फिनीश करेल, असं वाटत असताना 19व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादार ऋषभ 49 धावांवर बाद झाला. आतापर्यंत आयपीएलच्या बाराव्या हंगामात ऋषभनं 15 सामन्यात तब्बल 37.50च्या सरासरीनं 450 धावा केल्या आहेत.

वाचा- IPL 2019 : श्रेयस म्हणतो...मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है !

पंतच्या या खेळीचे अनेक दिग्गज खेळाडू चाहते झाले आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर सध्या ऋषभ पंतच्या या खेळीचीच चर्चा आहे. दरम्यान मिशेल वॉननं तर, पंत विश्वचषक संघात नाही यावर माझा अजूनही विश्वास नाही. पण ते निर्णय बदलतील असा विश्वास त्यानं ट्विटवरुन व्यक्त करत पंतच्या खेळीची प्रशंसा केली.

तर, दुसरीकडं बॉलिवृ अभिनेता ऋषी कपूरनंही पंत विश्वचषक संघात का नाही असा सवाल ट्विटरवरुन उपस्थित केला.

भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि सलामीवीर विरेंद्र सहवागनं ऋषभ पंत खरा गेमचेंजर आहे. असे व्यक्तव्य केले. तर, संजय मांजरेकर यांनी, आजपासून मी, ऋषभ पंतचा फॅन असे जाहीर केले.

एकीकडे ऋषभ पंतच्या खेळीचं कौतुक होत असताना, तो ज्याप्रकारे बाद झाला त्यावरही टीका होत आहे. जेव्हा संघाला विजय मिळवून देण्याची आपण इच्छा ठेवतो, तेव्हा आक्रमक फलंदाजसोबतच आपण काय शॉट खेळत आहोत, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले.

दरम्यान आता दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम सामन्यात मुंबईशी भिडेल. चेन्नईला नमवण्यासाठी पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि ऋषभ पंत या फलंदाजांवर जास्त जबाबदारी असणार आहे.

वाचा- IPL 2019 : खलील आणि पॉलची जुनी दुश्मनी, 3 वर्षानंतरही घेता आला नाही बदला

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 9, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading