विराट तर स्वित्झर्लंडमध्ये मग IPL खेळतंय कोण? पाहा VIDEO

विराट तर स्वित्झर्लंडमध्ये मग IPL खेळतंय कोण? पाहा VIDEO

'नकली विराट IPLमध्ये तर खरा स्वित्झर्लंडमध्ये' VIDEO होतोय व्हायरल

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : आयपीएलच्या 12 व्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सलग 6 पराभव पत्करावे लागले आहेत. यामुळे गुणतक्त्यात आरसीबी शेटवच्या स्थानावर राहिली आहे. पहिल्या दोन-तीन सामन्यातील पराभवानंतर विराटने पुन्हा चांगली कामगिरी करू असं सांगितलं होतं. पण तरीही आरसीबीच्या पराभवाची मालिका सुरू आहे. आरसीबीच्या चाहत्यांचा राग यामुळे वाढतच चालला आहे. रविवारी दिल्लीविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांनी सगळा राग विराटवर काढला. विराटकडे नेतृत्व करण्याची क्षमता नसल्याचंही चाहत्यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवर एका चाहत्याने विराटसारखा दिसत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देताना म्हटलं आहे की, खरा विराट तर स्वित्झर्लंडची राजधानी झुरिचमध्ये आहे आयपीएलमध्ये तर हुबेहुब विराटसारखा कोणीतरी खेळत आहे.

विराटच्या काही चाहत्यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष देण्यास सांगितले असून नेतृत्व सोडण्याचा सल्लाही दिला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल खेळताना अय्यरच्या 67 धावांच्या जोरावर दिल्लीने 4 विकेट राखून विजय मिळवला. दिल्लीचा गोलंदाज कसिगो रबाडाने सामन्यात चार गडी बाद केले.

वाचा : IPL : 'या' 8 खेळाडूंना मिळू शकते वर्ल्डकपचे तिकीट

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर विराट म्हणाला की, संघातील खेळाडूंची कामगिरी निराशाजनक आहे. 160 धावा पुरेशा होत्या. तेवढ्याही धावा आम्हाला करता आल्या नाही. प्रत्येक सामन्यातनंतर आम्ही पराभवाचे कारण नाही सांगू शकत. आम्हाला स्वीकारावे लागेल की आजही आम्ही चांगली कामगिरी करण्यात कमी पडलो.

वाचा : IPL मध्ये तिसऱ्यांदा स्टंपने केला घोटाळा, फलंदाज बादच होईना, पाहा VIDEO

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

First published: April 8, 2019, 5:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading