पंचांनी केली मोठी चूक, उमेश यादव आणि कोहली नाराज

पंचांनी केली मोठी चूक, उमेश यादव आणि कोहली नाराज

शेवटच्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर हैदराबादने 28 धावा काढल्या.

  • Share this:

बेंगळुरू, 05 मे : हैदराबादवर विजय मिळवून आरसीबीने यंदाच्या आयपीएलचा शेवट केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने सनरायझर्सला 4 गडी राखून पराभूत केलं. शनिवारी झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीचा संघ वादात अडकला. त्याना पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा सामना करावा लागला. यावेळी कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज उमेश यादव रागात दिसले.

सनरायझर्स फलंदाजी करत असताना 20 व्या षटकात उमेश यादवने टाकलेला चेंडू पंचांनी नो बॉल दिला. उमेश यादवचा मागचा पाय क्रिजच्या लाइनवर होता. जो थोडा मागे असायला हवा होता असं पंचांनी म्हटलं आहे. टीव्ही रिप्लेत उमेश यादवचा चेंडू नो बॉल नसल्याचं दिसलं. पंचांच्या या निर्णयावर उमेश यादव नाराज दिसला. त्यावेळी उमेश यादवने पंचांसोबत चर्चाही केली. तर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीही आश्चर्यचकीत झाला. तो पंचांकडे गेला मात्र काहीही बोलला नाही. त्यानंतर फ्री हीटवर विल्यम्सनला फक्त एकच धाव काढता आली.

हैदरबाकडून सलामीला आलेला रिध्दीमान साहा आणि मार्टिन गुपतील यांनी 46 धावांची भागीदारी केली, त्यानंतर उमेश यादवनं हैदराबादला पहिला झटका दिला. तीन ओव्हरमध्ये उमेश यादवनं किफायतशीर गोलंदाजी केली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन यानं उमेश यादवच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये केननं 6,4,6,4 अश्या तब्बल 27 धावा दिल्या. यात एक नो-बॉल टाकत त्यानं फ्रि हिटही दिली.

SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

First published: May 5, 2019, 12:46 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading