अभिनेत्याचे ट्विट, 'विराटने भारताचा कर्णधार होऊ नये त्याऐवजी...'

अभिनेत्याचे ट्विट, 'विराटने भारताचा कर्णधार होऊ नये त्याऐवजी...'

विराट तुला काय आवडतं? असं विचारल्यानंतर विराट भारताला कधीच वर्ल्डकप जिंकून देऊ शकत नाही असं अभिनेत्याने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : आय़पीएलमध्ये शनिवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रोमहर्षक सामना झाला. यात आरसीबीने सहा पराभवांची मालिका खंडित करत पहिला विजय साजरा केला. आरसीबीच्या या विजयानंतर बॉलीवूड अभिनेता केआरकेने ट्विटरवरून विराट कोहलीला खोचक प्रश्न विचारला आहे.

कमाल खान म्हणजेच केआरकेने ट्विट करून विचारले की, विराट कोहलीची आवडती सवय कोणती आहे. त्यासाठी तीन पर्याय त्याने दिले आहेत. यात शिव्या देणे, चित्रपट पाहणे आणि गाणं गाण्याची सवय हे पर्याय विचारले आहेत.

कमाल खानचे हे ट्विट आरसीबीच्या विजयानंतर लगेच करण्यात आले आहे. यानंतर चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वू अनेकदा विराटवर टीका केली होती. यात त्याच्या नेतृत्वावरही निशाणा साधला होती.

विराट कोहलीबद्दल घेतलेल्या सर्वेतून तो कॅप्टन नाही तर ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर असल्याचेही ट्विट केआरकेने केले आहे.

सलग सहा सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अखेर दणक्यात विराटच्या सेनेनं आपला पहिला विजय नोंदवला. या विजयासाठी विराटला चक्क सात सामन्यांची वाट पाहावी लागली. विराटनं 53 चेंडूत 67 धावा करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. तर एबीनं नाबाद 59 धावा केल्या.

वाचा : World Cup : सेहवागने निवडला भारतीय संघ, कर्णधार कोण?

प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेताना, अखेरच्या षटकात ख्रिस गेलनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबनं बंगळुरूला १७४ धावांचे आव्हान दिले. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेलने ४ चौकार लगावत दणकेबाज सुरुवात केली होती. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने ९ चेंडूत १९ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला मोठा धक्का बसला. कोहलीने 53 चेंडूंत 67 धावा केल्या. पण एबीच्या मॅच विनिंग खेळी करत आपल्या संघाला आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. मार्कस स्टोइनीसनं एबीला चांगली साथ देत, चेंडूत धावा केल्या.

वाचा : गावस्करांनी IPL मधून शोधला वर्ल्डकपसाठी चौथ्या नंबरचा खेळाडू

दरम्यान या सामन्याच्या सुरूवातीला बंगळुरू संघानं पंजाबच्या फलंदाजांना मैदानावर जास्त काळ टिकू दिलं नाही. दरम्यान ख्रिस गेलच्या एकाकी झुंजच्या बळावर पंजाबनं बंगळुरूसमोर धावांचे आव्हान ठेवले. विराटनं गेलचा 19व्या षटकात सोडलेला झेल बंगळुरूच्या संघाला महागात पडला. शेवटच्या षटकात ख्रिस गेलच्या धडेकाबाज फलंदाजीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांना लोटांगण घालण्याची पाळी आली. पण विराटनं सामना जिंकला.

PHOTOS : IPL खेळणारे 'हे' चार खेळाडू बलात्कार प्रकरणी होते दोषी

VIDEO : अन् रणजितसिंह मोहिते पाटील पक्षच विसरले, भाजपच्या सभेत केली चूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 02:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading