#Makading प्रकरणी अश्विन होतोय प्रचंड ट्रोल; काय आहे हे मंकडिंग प्रकरण?

रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरून सोशल मीडियात टोकाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. याला मंकडिंग असं का म्हणताहेत? काय संबंध आहे मंकड यांच्याशी?

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 03:41 PM IST

#Makading प्रकरणी अश्विन होतोय प्रचंड ट्रोल; काय आहे हे मंकडिंग प्रकरण?

मुंबई, 26 मार्च : रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरून सोशल मीडियात टोकाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा कॅप्टन अश्विन याने राजस्थान रॉयल्सच्या बटलरला नॉन स्ट्रायकर्स एंडला स्टंप्स उडवून बाद केलं. हे क्रिकेटिंग स्पिरिटच्या विरुद्ध आहे, असं अश्विनच्या टीकाकारांनी म्हटलं आहे.

अश्विन विरुद्धच्या ट्रोलर्सनी त्याच्या बायकोला आणि मुलीलाही सोडलेलं नाही. अश्विनची पत्नी प्रीती नारायणन हिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर टाकलेल्या फॅमिली फोटोवरसुद्धा सेक्सिस्ट कमेंट केल्या गेल्या आहेत.

अश्विनला अनेक क्रिकेट रसिक ट्रोल करत असले तरी, क्रिकेटच्या नियमांविरोधात अश्विनने काही केलेलं नाही. हर्ष भोगले यांनीसुद्धा हेच सांगत अश्विनची बाजू उचलून धरली आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन्स पंजाब हा सामना सोमवारी रात्री खेळला गेला. तेव्हा पंजाबचा कॅप्टन असलेल्या अश्विनने ज्या पद्धतीने बटलरला आऊट केलं त्याला म्हणतात मंकडिंग. बटलरला असं काही होणं अगदी अनपेक्षित होतं. तो 69 धावांवर बाद झाला आणि त्यामुळे क्रिकेटच्या या डाव्यालाच वळण मिळालं. पारडं हललं आणि अर्थातच पंजाबला या एका बळीचा चांगलाच फायदा झाला.

पण राजस्थानच्या समर्थकच नव्हे तर अनेक क्रिकेट रसिकही अश्विनच्या या कृतीवर नाराज आहेत. त्यांनी अश्विनवर सडकून टीका केली आहे आणि सोशल मीडियावर हा वाद रंगला आहे. ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला ते प्रकरण नेमकं आहे तरी काय? त्याला मंकडिंग, मंकड डिसमिसल किंवा मंकड आऊट असं का म्हणतात?


मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणए क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.

यावरून ऑस्ट्रेलियाच्या संघाने थैमान घातलं. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनीही भारतीय गोलंदाज कसा चुकीचं वागला याबद्दल लिहून विनू मंकड यांच्याविरोधात रान उठवलं. आजही हे यापद्धतीनं धावबाद करणं खेळाच्या उस्फूर्त भावनेच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीने आऊट झालं की मंकड डिसमिसल असं म्हटलं जात. मंकडिंग असं क्रियापदच क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये रूढ झालं आहे.


VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...