अश्विनचे एका षटकात 7 बॉल, पंचांनी पुन्हा केली चूक?

मुंबईविरुद्धच्या सामन्यात अश्विनने पहिल्याच षटाकत 7 चेंडू टाकले

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 02:15 PM IST

अश्विनचे एका षटकात 7 बॉल, पंचांनी पुन्हा केली चूक?

मुंबई विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लसिथ मलिंगाने टाकलेला चेंडू नो बॉल न दिल्याने निर्माण झालेला वाद शांत होण्याआधी आणखी एक वाद समोर आला आहे.

शनिवारी झालेल्या किंग्ज पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार अश्विनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी केली. यातील पहिल्याच षटकात अश्विनने 7 चेंडू टाकले. याकडे पंचानी लक्ष न दिल्याचे म्हटले जात आहे.

Loading...

सोशल मीडियावर याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात असून पंचांना धारेवर धरलं जात आहे. मात्र, अश्विनच्या या 7 चेंडू टाकण्यामागे वेगळंच सत्य असल्याचे समजते. पंचांनी पहिला चेंडू बाद (dead ball) ठरवल्याने अश्विनने 7 चेंडू टाकले.

मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवर पहिल्यांदा अश्विनने 7 चेंडू टाकल्याबद्दल प्रश्न विचारला होता. तर नंतर त्यांनीच अश्विनला पहिला चेंडू डेड बॉल दिल्याने 7 चेंडू टाकावे लागल्याची माहिती दिली.

याआधी मुंबई आणि बेंगळुरु यांच्यातील सामन्यात नो बॉल न दिल्याने पंचांवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आरसीबी पराभूत झाली असंही विराटने सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...