IPL मधून बाहेर, वर्ल्ड कप संघातही नसलेला रहाणे करतोय काय?

IPL मधून बाहेर, वर्ल्ड कप संघातही नसलेला रहाणे करतोय काय?

रहाणेनं चाहत्यांना इन्स्टाग्रामवर प्रश्न विचारला त्यावर धवनने दिलं मिश्किल उत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई, 11 मे : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला साखळी फेरीतून बाहेर पडावं लागलं. राजस्थानने शेवटच्या काही सामन्यात अजिंक्य रहाणेला कर्णधार पदावरून हटवलं. यंदाच्या हंगामात राजस्थानने 14 सामन्यात 5 विजय मिळवले.

स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अजिंक्य रहाणेनं घरी निवांत असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर त्याने म्हटलं आहे की, मी काय पाहत आहे याचा कोणी अंदाज लावू शकतं का?

रहाणेच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यात काहींनी अॅडव्हेंजर्स गेम किंवा कॉफी विथ करण पाहत असशील असं म्हटलं आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवननेसुद्धा त्याला ट्रोल केलं आहे. धवन म्हणाला की, टीव्ही पाहतोयस दुसरं काय? यानंतर रहाणेला ट्रोल केलं गेलं.

आयपीएलमधून राजस्थान बाहेर पडल्यानंतर आता रहाणे घरी आहे. त्याला वर्ल्ड कपच्या संघातीही स्थान मिळालेलं नाही. त्यामुळं वर्ल्ड कपच्या संघात जागा कशी मिळवायची हे पाहत आहे असं एका युजरने म्हटलं आहे.

अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याने 14 सामन्यात 393 धावा केल्या. यात एका शतकाचा समावेश आहे.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 11, 2019, 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading