IPL 2019 : अश्विनच्या 'या' एका निर्णयानं पंजाबचा खेळ खल्लास

13 सामन्यात 10 गुण मिळवत गुणतक्त्यात पंजाब शेवटच्या स्थानावर आहे.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 06:07 PM IST

IPL 2019 : अश्विनच्या 'या' एका निर्णयानं पंजाबचा खेळ खल्लास

मोहाली, 05 मे : आयपीएलच्या बारावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असताना सगळे संघ विजेतेपदासाठी आगेकुच करत आहे. असं असताना आर अश्विननं स्वत: आपल्या संघाला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आर अश्विनचा पंजाब संघ आज चेन्नई विरोधात आपल्या हम ग्राऊंडवर खेळत असून, त्यांनी नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अश्विनच्या या निर्णयामुळं पंजाबसाठी प्ले ऑफचे स्वतःचे दरवाजे बंद झाले आहे. दरम्यान, पंजाबला प्ले ऑफच्या आशा जीवंत राखण्यासाठी या सामन्यात जास्त धावांचे लक्ष चेन्नईसमोर ठेऊन त्यांना 100च्या आत बाद करत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. दरम्यान त्यांनी चेन्नईला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. चेन्नईनं पंजाबच्या गोलंदाजांना न जुमानता 170 धावा केल्या यात ड्यु प्लेसिसची 96 धावांची खेळी महत्वाची ठरली.एकीकडं गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर असलेल्या चेन्नईला आपले पहिले स्थान अबाधित राखण्यासाठी हा विजय आवश्यक आहे. तर आता आपल्या घरच्या मैदानावर पंजाब आयपीएलचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न करेल. आयपीएलच्या 12 व्या हंगामात प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलेल्या चेन्नईचा गुणतक्त्यात शेवटच्या स्थानी असलेल्या पंजाबविरुद्ध सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवून चेन्नई पहिले स्थान अबाधित राखण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवून पुन्हा लय पकडली आहे. चेन्नईने 13 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 गुण प्राप्त केले आहेत.

Loading...

पंजाबचा संघ जाता जाता प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्यांनी 13 सामन्यात 10 गुण मिळवले आहेत. गुणतक्त्यात पंजाब शेवटच्या स्थानावर आहे. त्यांनी विजय मिळवला तर आरसीबीला मागे टाकून सातव्या क्रमांकावर पोहचतील. प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.


SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...