DC vs CSK : चेन्नईचं पारडं जड, पण धोनीला दिल्लीच्या 'या' युवा खेळाडूंपासून खतरा !

दिल्ली आणि चेन्नई यांच्यात युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू असा सामना रंगणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 05:44 PM IST

DC vs CSK : चेन्नईचं पारडं जड, पण धोनीला दिल्लीच्या 'या' युवा खेळाडूंपासून खतरा !

चेन्नई, 09 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगाम संपण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत. यात मुंबई इंडियन्सनं चेन्नईला नमवत याआधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं फायनलमध्ये मुंबईला कोणता संघ टक्कर देणार हे उद्या दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्लीनं शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीनं अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात महत्त्वाची भुमिका बजावली ती युवा खेळाडूंनी. मुळातच युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी हैदराबाद विरोधात आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह दिल्ली आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईशी भिडणार आहे. तर, पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं निराशाजनक कामगिरी करत मुंबईकडून आपल्या घरच्या मैदानावर पराभव स्विकारला.

वाचा- IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं

युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू सामना

दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामना म्हणजे युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू असा असणार आहे. दिल्लीच्या संघाकडे ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, समीर लाचिमने, किमो पॉल यांसारखे युवा खेळाडू आहेत. तर, चेन्नई संघाकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. महेंद्रसिंग धोनी, ड्युप्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो यांसारख्या खेळाडूंवर चेन्नईच्या संघाची मदार आहे.

Loading...

वाचा- IPL 2019 : झिवा नाही तर आता सोशल मिडियावर 'या' लाडक्या लेकीची चर्चा

हेड टू हेड

दिल्ली आणि चेन्नई आतापर्यंत 20 वेळा एकमेकांसमोर आले आहे. यात चेन्नईचं पारडा जास्त जड आहे. चेन्नईनं तब्बल 14 वेळा दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर, दिल्लीनं 6 सामन्यात चेन्नईला नमवलं आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई आणि दिल्ली 2 वेळा भिडले आहेत. या दोन्ही सामन्यात चेन्नईनं बाजी मारली आहे.

वाचा- IPL 2019 : श्रेयस म्हणतो...मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है !


VIDEO : जब मिले दो यार, मग मैदानात नुसता राडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...